PCMC Shikshak Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळवण्यासाठी थेट ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Shikshak Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक” पदांच्या एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज 01 एप्रिल 2024 पासून म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक शिक्षक : एच.एस.सी.- डी.एड

पदवीधर शिक्षक : एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय), एच.एस.सी.- डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

यासाठी अर्ज समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.