UPSC Bharti 2024 : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती, आताच करा अर्ज, जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Bharti 2024 : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहूया…

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक संचालक (रिमोट सेन्सिंग), उपायुक्त (NRM/RFS), उपसंचालक (वैद्यकीय), सहाय्यक खाण नियंत्रक, प्रशिक्षण अधिकारी, सहायक प्राध्यापक आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 30 ते 50 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क 25/- रुपये आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 16 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://upsconline.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करा, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करा.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.