Vasai Vikas Sahakari Bank Bharti : वसईच्य सहकारी बँकेत नोकरीची संधी; पदवीधर, बीटेक उमेदवारांनी करा या लिंकवर क्लीक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vasai Vikas Sahakari Bank Bharti : वसई विकास सहकारी बँक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी करू इच्छित असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “नेटवर्क अभियंता, शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती साठी पदवीधर,बीटेक उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी वसई विकास सहकारी बँक लि., (शेड्युल्ड बँक). या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची 27 एप्रिल अशी आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://vasaivikasbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-अर्ज पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल आहे.

-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.