Loco Pilot Salary: रेल्वे चालवणाऱ्या लोको पायलटला किती असतो पगार? लोको पायलट होण्यासाठी काय लागते शैक्षणिक पात्रता? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loco Pilot Salary:- प्रवाशांना यशस्वीपणे व सुरक्षितरित्या त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही रेल्वेच्या लोको पायलटच्या खांद्यावर असते. ट्रेन चालवणे आणि प्रवासाच्या दरम्यान तिची व्यवस्थित देखभाल करणे ही प्रामुख्याने लोको पायलट ची जबाबदारी असते. लोको पायलट हे पद भारतीय रेल्वेतील एक वरिष्ठ पद असून त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला थेट लोको पायलट होता येत नाही.

यामध्ये आधी उमेदवारला लोको पायलट होण्यासाठी आधी असिस्टंट लोको पायलट होणे गरजेचे असते. जेव्हा उमेदवाराची असिस्टंट लोको पायलट पदाकरिता निवड होते व त्यानंतर उमेदवाराला वरिष्ठ लोको पायलट पदावर प्रमोशन मिळते. लोको पायलटचे काम संपूर्ण जबाबदारीने भरलेले असते.

कारण रेल्वे मधील हजारो प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा ही लोको पायलट वर असते. त्यामुळे लोको पायलटला स्वतःचे काम अतिशय हुशारीने पार पडणे गरजेचे असते. साधारणपणे ट्रेनमध्ये दुरुस्ती आणि देखभालीची कामे करणे, लोकोमोटिव्ह इंजिनची कार्यक्षमता योग्य ठेवणे, सिग्नल बदलांचे निरीक्षण करणे इत्यादी महत्त्वाचे ऑपरेशन्स वर लोको पायलटला काम करावे लागते.  या महत्त्वाच्या अशा लोको पायलटला किती पगार मिळतो? याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न येत असेल. याच प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात आपण बघणार आहोत.

 लोको पायलटला किती असते पगार?

रेल्वे भरती मंडळात असिस्टंट लोको पायलट चा पगार चांगला असतो व याकरिता आरआरबी एएलपी परीक्षा आयोजित करणाऱ्या रेल्वे भरती मंडळाच्या माध्यमातून पगाराचा तपशील जाहीर केला जातो. यामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार आरआरबी एएलपी सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार निर्धारित केले जाते.

पायलट चे वेतन रुपये 19 हजार 900 ते 35 हजार पर्यंत असते. तसेच यामध्ये विविध प्रकारची भत्ते व फायदे देखील अंतर्भूत असतात.या पदासाठी निवड होण्याकरिता उमेदवारांना विशिष्ट निवड प्रक्रियेतून जावे लागते व ते म्हणजे फर्स्ट लेवल सीबीटी, सेकंड लेव्हल सीबीटी, सीबीएटी/ कंप्यूटर आधारित एट्टीट्यूड टेस्ट आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन अशा पद्धतीची निवड प्रक्रिया असते.

जर आपण कामाचे तास पाहिले तर लोको पायलट साठीची आठ तासांची शिफ्ट असते. यामध्ये जर एखादे स्टेशन थोडे लवकर किंवा उशिरा आले तर पुढचा पायलट त्याचा ताबा घेतो. लोको पायलटला कमीत कमी एक आठवड्यात 36 तास काम करणे गरजेचे आहे व त्यापेक्षा जास्त काम केल्यास याकरिता अतिरिक्त पगार मिळतो व ज्याला आपण ओव्हर टाईम म्हणतो.

 लोको पायलट होण्यासाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक मोटर वाहन, मिल राईट देखभाल मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक,टर्नर, वायरमन, आर्मिचर आणि कॉईल वाइंडर, यांत्रिक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिक इत्यादी आयटीआय प्रमाणपत्र/ डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे.

लोको पायलट होण्यासाठीची वयोमर्यादा

असिस्टंट लोको पायलट होण्याकरिता उमेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे.