Ministry of Defence Bharti : मुंबई संरक्षण मंत्रालयात निघाली भरती; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ministry of Defence Bharti 2024 : सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “रजिस्ट्रार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख आजपासून 60 दिवस आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी उमेदवार मास्टर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वरील पदासाठी वयोमर्यादा 56 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रधान संचालक (व्यक्ती), मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी, संरक्षण मंत्रालय, कक्ष क्रमांक 33, काश्मीर हाऊस, राजाजी मार्ग, नवी दिल्ली- 110011 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

आजपासून अर्ज 60 दिवसांपर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mod.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

-इच्छुकांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे. लक्षात घ्या अर्ज आजपासून 60 दिवसांपर्यंत सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.