PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरु आहे भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर मोठी भरती सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखतीस संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. मुलाखत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८ येथे आयोजित केली जात आहे, तरी उमेदवारांनी वेळेत या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

भरती साठी वयोमर्यादा 70 वर्षे इतकी आहे. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट देऊ शकता.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर आयोजित केली जात असून, संबंधित पत्त्यावर हजर राहावे.
-उमेद्वारांकरिता मुलाखती आठवडयातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहीरत काळजीपूर्वक वाचावी.