ICT Mumbai Bharti 2024 : ICT मुंबई अंतर्गत लिपिक पदाकरिता भरती सुरु; पदवीधर उमेदवारांनी असा करा अर्ज!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “लिपिक टंकलेखक, कुक-सह-अटेंडंट” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदरच सादर करायचे आहेत.

या जागांसाठी उमेदवार पदवीधर किंवा १० वी पास असणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेलेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. यासाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. येथे 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतात. यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

यासाठी अर्ज ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई-400 019’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे, तसेच दिलेल्या तारखे पर्यंत म्हणजेच 20 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, उमेदवारांना या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास उमेदवार अधिकृत वेबसाईट https://www.ictmumbai.edu.in/ला भेट देऊ शकतो.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, अर्ज 20 मार्च 2024 पर्यंतच सादर करावेत, यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे