शेतकरी पुत्राचा जय हो…! शासनाला जमले नाही ते शेतकरी पुत्राने करून दाखवलं; ‘ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे’ युवा शेतकऱ्याचा नवखा उपक्रम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News: गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच सुलतानी दडपशाहीमुळे पुरता मेटाकुटीला आला असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. या वर्षी देखील निसर्गाच्या लहरीपणाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

अकोला जिल्ह्यातील (Akola) विशेषता जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकरी बांधवांना पावसाच्या (Rain) लहरीपणामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चिखली तालुका व आजूबाजूच्या परिसरात अजूनही समाधानकारक असा मोसमी पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीसाठी अडथळे येत आहेत.

शिवाय ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी करून ठेवली आहे अशा शेतकरी बांधवांना देखील पावसाच्या उघडीपीचा मोठा फटका बसत असून आता या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. यामुळे पहिल्यांदा पिक पेरणीसाठी आलेला हजारो रुपयांचा खर्च शिवाय केलेली मेहनत सर्व काही मातीमोल होणार आहे.

यामुळे तालुक्‍यातील शेतकरी बांधव मोठ्या विवंचनेत सापडला असून दुबार पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही. तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ही व्यथा एका शेतकरी पुत्राने समजून घेतली आणि शेतकरी पुत्र शेतकऱ्यांसाठी आता एक अनोखी योजना राबवित आहे.

चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथील श्रीकृष्ण थुट्टे या नवयुवक शेतकऱ्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे ही संकल्पना राबवली आहे. या नवयुवकाने सुरू केलेल्या या मोहिमेच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करायची आहे अशा शेतकरी बांधवांना डिझेल टाकून शेतीची कामे करता येणार आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आणि दुबार पेरणी करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या अल्पशा पावसानंतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. त्यामुळे पिकांची उगवण झाली खरी मात्र आता पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला यामुळे अधिक पावसाने खरीप हंगामातील पिकांची उगवण होऊ शकले नाही.

अशा दोन्ही परिस्थितीत शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच शेतकरी बांधवांनी हजारो रुपयांचा खर्च करून खरीप हंगामात पेरणी केली होती आता पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याने अजून हजारो रुपये कुठून आणायचे असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांच्या पुढ्यात येऊन ठेवला आहे.

अशा परिस्थितीत भरोसा येथील श्रीकृष्ण यांनी सुरू केलेला हा उपक्रम अनेक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या नवयुवक शेतकरी पुत्राने सुरू केलेला हा उपक्रम सध्या तालुक्यात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. निश्चितच जे मायबाप शासन करू शकले नाही ते एका नवयुवक शेतकरी पुत्राने करून दाखवले आहे.