Black Turmeric : काळी हळद लागवड करा आणि कमवा लाखों रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीतून बंपर कमाई करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा पिकाच्या शेतीविषयी सांगणार आहोत, जे की तुम्हाला लाखों रुपये कमवून देऊ शकते.

या पिकाची शेती केली म्हणजे आपण एका झटक्यात श्रीमंत होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो जर आपण काळ्या हळदीच्या पिकाची लागवड केली तर शंभर टक्के मालामाल होणार. कारण की काळी हळद खुप महाग विकली जाते.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, काळ्या हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामुळे काळ्या हळदीची किंमत (Price of Black Turmeric) खूप जास्त आहे.

मित्रांनो यामुळे काळ्या हळदीच्या लागवडीतून मोठा नफा मिळू शकतो. काळ्या हळदीच्या झाडाच्या पानांवर मध्यभागी काळी पट्टी असते. त्याचा कंद आतून काळ्या किंवा जांभळ्या रंगाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया काळ्या हळदीची लागवड कशी होते आणि किती फायदा होतो.

काळी हळद लागवड माहिती मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कृषी शास्त्रज्ञ, काळ्या हळदीची लागवड जून महिन्यात करण्याचा सल्ला देत असतात. या पिकाच्या लागवडीसाठी भुसभुशीत चिकणमाती असलेली जमिन सर्वात योग्य असल्याचे सांगितले जाते.

मात्र लागवड करताना पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो जर आपणास एका हेक्टरमध्ये काळ्या हळदीची लागवड करायची असेल तर सुमारे 2 क्विंटल काळ्या हळदीच्या बियाणे लागेल. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते.

एवढेच नाही तर या पिकासाठी कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाचीही गरज भासत नाही. याचे कारण म्हणजे या पिकावर कीटक अटॅक करत नाहीत. मात्र, असे असले तरी या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी लागवडीपूर्वी जुन्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा असा सल्ला दिला जातो.

काळ्या हळदीचे बाजारमूल्य सर्वाधिक आहे मित्रांनो, आपली साधी पिवळी हळद 60 ते 100 रुपये किलोने विकली जाते. मात्र काळ्या हळदीचा भाव 800 ते 1000 रुपये किंवा त्याहूनही अधिक झाला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सध्या काळ्या हळदीचा तुटवडा भासू शकतो यामुळे याच्या दरात अजून वाढ होणार आहे.

कोविडनंतर या हळदीची मागणी खूप वाढली आहे. ही काळी हळद रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. काळी हळद ही आपल्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथ आणि अनेक महत्त्वाची औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.

किती उत्पादन मिळणार शेतकरी मित्रांनो एका एकरात काळ्या हळदीची लागवड केल्यास सुमारे 50-60 क्विंटल कच्ची हळद म्हणजेच सुमारे 12-15 क्विंटल सुकी हळद सहज उपलब्ध होते. साहजिकच आपल्या इतर हळदीपेक्षा काळ्या हळदीचे उत्पादन कमी आहे मात्र या काळ्या हळदीची किंमत खूप जास्त आहे.

काळी हळद 500 रुपये किलोने सहज विकली जाते. देशात असेही काही शेतकरी आहेत ज्यांनी काळी हळद 4000 रुपये किलोपर्यंत विकली आहे.

अनेक ऑनलाइन वेबसाईटवर काळी हळद 500 ते 5000 रुपये किलो पर्यंत विकली जात आहे. जर तुमची काळी हळद फक्त 500 रुपयांना विकली गेली तर 15 क्विंटलमध्ये तुम्हाला 7.5 लाख रुपयांचा नफा होईल. दुसरीकडे 4,000 रुपये किलोने विकले तर समजा तुम्ही घरी बसून श्रीमंत झाला आहात.