Drumstick Farming : ‘या’ महिला शेतकऱ्याने शेवगा लागवड करत साधली प्रगती; वाचा महिला शेतकऱ्याची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Drumstick Cultivation :- देशातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल करीत आहेत. काळाच्या ओघात शेतीमध्ये केलेला बदल आणि आधुनिकतेची धरलेली कास शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते (Chandrapur District) चंद्रपूर जिल्ह्यातून.

पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दिला आणि आधुनिक तेची कास धरली तर आजच्या घडीला शेती खरंच परवडणारी ठरते. शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढणारा उत्पादन खर्च आणि पदरात येणारे तुटपुंजी उत्पन्न याची सांगड घालणं अशक्य होत असल्याने.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याच्या आमडी येथील महाकुलकर दांपत्याने शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचे ठरवले. शेतीमध्ये नवीन बदल करण्याच्या अनुषंगाने या दाम्पत्यांनी शेवग्याची शेती (Drumstick Cultivation) सुरू केली.

शेवग्याची शेती या दांपत्यासाठी मोठी फायद्याची सिद्ध झाली आहे आणि यामुळे त्यांच्या गावातील शेतमजुरांना हाताला काम देखील गावलं आहे.

शेतीमध्ये नवीन बदल आत्मसात केल्यास केवळ फायदाच होईल असे नाही तर यामुळे तोटा देखील होऊ शकतो. मात्र, या दाम्पत्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अफाट आत्मविश्वासाने तसेच योग्य नियोजनाची सांगड घालत शेवग्याची शेती यशस्वी करून दाखवली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाअंतर्गत अल्पभूधारक महिला शेतकरी (Farmer) मीनाक्षी महकुळकर यांना 2021-22 या आर्थिक वर्षात पंचायत समिती बल्लारपूर मार्फत शेवगा लागवडीचा लाभ मिळाला होता. या अनुषंगाने त्यांनी वसंत या शेवगाच्या जातीची लागवड केली.

तीन एकर क्षेत्रासाठी त्यांना सुमारे 2250 शेवग्याच्या रोपांची आवश्यकता लागली होती. या योजनेअंतर्गत त्यांना तीन वर्षासाठी एक लाख 63 हजार रुपये मंजूर करण्यात आले.

सध्या या दाम्पत्याने लावलेली शेवग्याची रोपे नऊ महिन्याचे झाले असून त्यांना आता शेंगा लागल्या आहेत. महकुळकर जोडपे दिवसाला आठ ते दहा क्विंटल शेंगा चंद्रपूर तसेच बल्लारपूर या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत.

सध्या त्यांच्या शेंगांना चार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. यामुळे त्यांना शेवग्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न प्राप्त होण्याची आशा आहे. एकंदरीत शेतीत केलेला हा महत्त्वाचा बदल या दांपत्यासाठी मोठा मैलाचा ठरत असून त्यांना मोठे यश मिळणार आहे.