Farmer Jugaad: ‘या’ शेतकऱ्याने बनवला अनोखा जुगाड! गोठ्यातील शेण उचलले जाईल मिनिटात, पहा व्हिडिओ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Jugaad:- बहुतांशी शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन प्रामुख्याने केले जाते. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व तो शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक कणा असल्याचे देखील  आपल्याला दिसून येते.

पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या गोठ्यात आपल्याला विविध प्रकारच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कामे करावी लागतात. यातीलच एक महत्त्वाचे काम म्हणजे जनावरांचे शेण उचलणे हे होय. एक दोन गाई किंवा म्हशी किंवा इतर जनावरे राहिली तर आपण हाताने शेण पटकन उचलू शकतो.

परंतु जर जनावरांची संख्या 10 ते 20 पेक्षा जास्त असेल तर मात्र हाताने शेण उचलण्याचे काम जिकरीचे ठरते. यामध्ये बराच वेळ वाया जाऊ शकतो. तसेच काही शेतकऱ्यांकडे तर पशुपालन व्यवसायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जनावरांची संख्या असते की कधी कधी ती 100 च्या पुढे देखील असते.

त्यामुळे इतक्या जनावरांचे शेण उचलणे वाटते तितके सोपे काम नाही. याच समस्येला डोळ्यासमोर ठेवून एका शेतकऱ्याने हजार ते दीड हजार रुपयांमध्ये असे एक जुगाड बनवले आहे की त्या माध्यमातून अगदी आरामांमध्ये आपण शेण एका ठिकाणी जमा करू शकतो. नेमका शेतकऱ्याने जुगाड कसा बनवला आहे? याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 शेतकऱ्याने अशा पद्धतीने बनवला जुगाड

या शेतकऱ्याने याकरिता दोन पद्धतीचे जुगाड यंत्र तयार केले असून त्यामधील एका यंत्राला राऊंड पाईप चा वापर करण्यात आलेला आहे. ज्या पाईपच्या साह्याने आपल्याला हँडल सारखे ते हातात धरता येते. तसेच स्क्वेअर पाईपचा देखील यामध्ये वापर करण्यात आलेला असून त्या जुगाड यंत्राला लहान मुलांच्या सायकलीचे चाक बसवण्यात आलेले आहे.

यामध्ये लोखंडी पाईपांचा एक सांगाडा तयार करण्यात आला असून पुढे दोन फुटाचा पत्रा लावण्यात आलेला व ते पत्र्याच्या साह्याने शेण गोळा करत असताना मागून सपोर्ट रहावा याकरिता मागून पत्र्याला दोन पट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत. या पद्धतीने जे काही जुगाड बनवलेले आहेत त्या साह्याने तुम्ही सायकल सारखा हँडल पकडून या जुगाड यंत्राच्या साह्याने गोठ्यातील शेण पटकन जमा करू शकता.

तसेच या सोबतच एक दुसऱ्या पद्धतीचे जुगाड यंत्र या शेतकऱ्याने बनवले असून त्याकरता पाऊण इंचीचा स्क्वेअर पाईपचा वापर करण्यात आला आहे. तसेच एक इंच पाईप त्याला जोडून त्या पाईपला स्प्रिंग जोडण्यात आलेली आहे. यामध्ये पाऊन इंचचा पाईपला होल मारून त्यामध्ये नट व्यवस्थित पॅक करण्यात आला आहे जेणेकरून बसवलेली स्प्रिंग व्यवस्थित राहावी हा त्यामागचा उद्देश आहे.

यामध्ये एक इंच च्या पाईपला दोन्ही बाजूंनी बिजागरी देखील जोडण्यात आलेली आहेत. खालच्या बाजूने डब्याचा आकारात तयार केला असून यंत्राच्या साहाय्याने देखील अनोख्या पद्धतीने शेण जमा करू शकता. नेमकी ही दोन्ही जुगाड यंत्र कशा पद्धतीने काम करतात हे पूर्ण समजण्यासाठी तुम्ही खाली दिलेला व्हिडिओ नक्कीच पहा.

 जुगाड यंत्र पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा