Farming Business: खरीप हंगामात करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती आणि कमवा लाखों; कसं ते जाणुन घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea : सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामात (Kharif Season) पेरणी करण्यासाठी शेत जमिनीची पूर्वमशागत (Pre Cultivation) करताना नजरेस पडत आहेत.

येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन (Mansoon) होईल आणि बळीराजा खरिपाची पेरणी सुरू करेल. यामुळे आज आपण खरीप हंगामात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या एका औषधी वनस्पतीच्या शेती (Medicinal Plant Farming) विषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो खरं पाहता भारतात गेल्या अनेक वर्षांपासून औषधी वनस्पतींची शेती केली जात आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगला मोठा नफा देखील मिळतं आहे. औषधी वनस्पतीला बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकरी बांधव आता याच्या शेतीकडे सरसावले आहेत.

औषधी वनस्पतीच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या शेतीसाठी मायबाप शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन (Government) देखील दिले जात आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

यामुळे गेल्या दशकापासून याच्या शेतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मित्रांनो औषधी वनस्पती पैकी एक प्रमुख वनस्पती आहे अश्वगंधा. खरं पाहता अश्वगंधा औषधी वनस्पती Ashwagandha Farming) असली तरी देखील या पिकाला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया अश्वगंधा शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी.

अश्वगंधा शेती साठी उपयुक्त शेतजमीन
अश्वगंधा या वनस्पतीची शेती इतर औषधी वनस्पती च्या तुलनेत अधिक सोपी असल्याचे सांगितले जाते. अश्वगंधा या औषधी वनस्पतीची लागवड अशा जमिनीत केली गेली पाहिजे ज्या जमिनीत पाण्याचा उत्तम निचरा होतो.

याशिवाय चिकन माती असलेली शेतजमीन व हलकी माती असलेली शेतजमीन याच्या लागवडीसाठी उपयुक्त असल्याची माहिती कृषी वैज्ञानिक देत असतात. अश्वगंधा ची लागवड ज्या जमिनीचा पीएच मूल्य अर्थात सामू 7.5 ते 8 यादरम्यान असतो अशा शेतजमिनीत करावे जेणेकरून यापासून अधिक उत्पादन मिळवता येणे शक्य होईल.

अश्वगंधा शेती यातील सर्वात मोठी विशेषता म्हणजे एकदा याची लागवड केली की सलग पाच वर्षे यापासून उत्पादन मिळवता येते.

अश्वगंधा शेती साठी उपयुक्त हवामान
मित्रांनो खरे पाहता भारतातील हवामान अश्वगंधा शेतीसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अश्वगंधा वनस्पती च्या चांगल्या विकासासाठी आणि त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी 20 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान योग्य असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात.

ज्या प्रदेशात 500 ते साडेसातशे मिलिमीटर पाऊस पाऊस पडतो अशा प्रदेशात अश्वगंधा पिकाची शेती केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते. अश्वगंधा शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी याची लागवड जमिनीत मुबलक ओलावा असलेल्या व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात केली जावी असा सल्ला दिला जातो.

शेतकरी मित्रांना अश्वगंधा शेती किंवा अन्य औषधी वनस्पतींची शेती करण्याआधी प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी प्रशिक्षण सेंट्रल इन्स्टिट्यूट मेडिसिनल अँड एरोमॅंटिक प्लांट या संस्थेत दिले जाते.

50 हजार खर्च अन साडे तीन लाख उत्पन्न
अश्वगंधा या औषधी वनस्पती ची शेती सुरु केल्यापासून ते काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन केल्यास याच्या शेतीतून चांगली बक्कळ कमाई केली जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो जर याची लागवड पाच एकर क्षेत्रात केली तर यासाठी सुमारे 50 हजार खर्च अपेक्षित असतो आणि यापासून जवळपास साडेतीन लाखांचे उत्पन्न सहजरीत्या कमवले जाऊ शकते.

म्हणजेच एकरी 70 हजार रुपयांच्या आसपास कमाई या अश्वगंधा वनस्पतीतुन केली जाऊ शकते.