Goat Farming Business : शेळीपालन करून व्हा श्रीमंत ! कशी कराल सुरवात ? वाचा स्टेप बाय स्टेप सर्व माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Farming Business: शेळीपालन व्यवसाय हा भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा पशुपालन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाचे जर आपण काही सकारात्मक पैलू पाहिले तर ते म्हणजे या व्यवसायाला लागणारी जागा ही कमी लागते व पशुपालनाच्या दृष्टिकोनातून खर्च देखील खूप कमी लागतो. त्यामुळे कमी खर्चात चांगला नफा देण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे. शेळी हा काटक प्राणी असल्यामुळे इतर खर्च देखील बऱ्याच प्रमाणे वाचतात.

या बाबींमुळेच शेळीपालन व्यवसायाकडे आता तरुण सुशिक्षित बेरोजगार देखील मोठ्या प्रमाणावर वळले असून काही तरुणांनी करिअर म्हणून शेळी पालन व्यवसायाची निवड केलेली दिसते. परंतु शेळीपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्याकरिता शेळ्यांच्या दर्जेदार आणि जातिवंत जातींची निवड करणे तितकेच महत्त्वाचे असते. भारतामध्ये शेळ्यांच्या अनेकविध जाती आहेत. परंतु त्यातील उत्तम जातींची निवड ही खूप महत्त्वाचे ठरते. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण शेळीच्या अशाच एक महत्त्वपूर्ण जाती विषयी माहिती घेणार आहोत.

 ब्लॅक बेंगाल जातीची शेळी शेळीपालनासाठी आहे उत्तम

ब्लॅक बेंगल या जातीची शेळी शेळी पालनासाठी खूप फायद्याचे असून ही शेळी आकाराने लहान असते व भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये आढळून येते. तर आपण या जातीच्या शेळीची शरीर रचना पाहिली तर तिचे पाय लहान आणि चेहरा गोल असतो व त्यासोबतच नाकाची रेषा सरळ असून ती दाबली गेलेली असते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे या शेळीचे सगळ्यात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ही कोणत्याही हवामानात तग धरून राहते. त्यामुळे हवामान बदलाचा तितकासा परिणाम या शेळीवर दिसून येत नाही. ब्लॅक बेंगल शेळी ही मांस उत्पादनासाठी खूप महत्त्वाची असून एका शेळी पासून 18 ते 20 किलो पर्यंत मांस उत्पादन मिळू शकते. साधारणपणे आठ ते दहा महिन्यात या जातीची शेळी प्रौढ होते.

 दूध उत्पादनात देखील आहे फायद्याचे

ब्लॅक बेंगल शेळी ही दूध उत्पादनासाठी देखील महत्त्वाचे असून खूप चांगल्या दर्जाचे दूध या जातीच्या शेळी पासून मिळते. जवळजवळ तीन ते चार महिन्यांपर्यंत ही शेळी दूध देते व दररोज अर्धा लिटर पर्यंत एक शेळी दूध देऊ शकते. तसेच ब्लॅक बेंगल शेळीच्या गर्भधारणेचा कालावधी पाहिला तर तो साधारणपणे  बारा महिन्यानंतरचा असतो. तिचे ऋतुचक्र हे 18 ते 20 दिवसांच्या असते व यामध्ये या जातीच्या शेळीला गर्भधारणा होत असते.

 या महिलेने ब्लॅक बंगाल शेळीचे पालन करून मिळवली यश

ब्लॅक बेंगॉल शेळी शेळीपालनासाठी किती उत्तम आहे हे आपल्याला बिहारमधील एक प्रगतिशील महिला शेतकरी प्रमिला यांच्या उदाहरणावरून समजून घेता येईल. त्यांनी एका बचत गटाच्या मदतीने वर्षभरापूर्वी 22 हजार रुपयांचे कर्ज घेऊन शेळी पालन व्यवसाय सुरू केला व व्यवसाय सुरू करताना त्यांनी प्रामुख्याने ब्लॅक बेंगाल जातीच्या शेळ्यांची निवड केली.

तेव्हापासून या व्यवसायाच्या माध्यमातून ते चांगला पैसा मिळवत असून यांच्या या शेळीपालनामुळे अन्य महिला देखील प्रभावित झाल्या. त्यांच्या पंचायतीच्या माध्यमातून वीस गटातील जवळजवळ 400 महिलांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. ब्लॅक बेंगल शेळीची जमेची बाजू म्हणजे ही एका वेळेस दोन ते तीन पिल्लांना जन्म देते.

 या शेळीच्या पालनातून किती उत्पन्न मिळू शकते?

मांस उत्पादनासाठी ही शेळी प्रसिद्ध असून एका वर्षामध्ये तीन पिल्लांना जन्म देण्याची क्षमता याशिवाय येत आहे. यामधील एक लहान बोकड जरी साडेतीन हजार रुपयाला विकले तरी एका शेळीच्या माध्यमातून साडेदहा हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच जर 10 शेळ्या पाळल्या तर एका वर्षात एक लाख 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. या मधून खर्च वजा जाता ह्या शेळ्यामध्ये एका वर्षात 84 ते 45 हजार रुपयांचा निव्वळ नफा आपल्याला मिळू शकतो.