Monsoon Update 2022 : पाऊस कधी पडणार? IMD ने केली मान्सूनबाबत चिंताजनक भविष्यवाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update 2022 : मान्सूनबाबत आता पुन्हा चिंता करावी लागणार आहे. कारण हवामान खात्याने देशात वेळेआधी मान्सून येईल, असा अंदाज वर्तवला असताना मान्सून थोडासा कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.

२७ मे रोजी म्हणजेच आज मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता. पण आता केरळमध्ये मान्सून पोहोचण्यास ४ दिवस उशीर होणार असल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे.

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यावेळी मान्सून स्थलांतरित होण्यासाठी ४ दिवसांचा विलंब होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून नुकताच दक्षिण पश्चिम अरबी समुद्राच्या (Southwest of the Arabian Sea) काही भागात पोहोचला आहे.

मान्सून साधारणपणे १ जून (1 June) रोजी केरळमध्ये पोहोचतो. गेल्या वर्षी ३ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, मात्र यंदा तो लवकर येण्याची अपेक्षा होती. यावेळी मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे. यावेळी ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

IMD ने ट्विट (Tweet) केले आहे की पुढील ४८ तासांत नैऋत्य मान्सून नैऋत्य अरबी (Southwest Monsoon Southwest Arabic) समुद्राच्या काही भागात, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि बंगालचा उपसागर आणखी पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे.

सीएसएच्या (CSA) हवामान विभागाचे प्रभारी डॉ. एस.एन. सुनील पांडे म्हणाले- दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस पडेल, मात्र पावसाचे दिवस कमी असतील. ते म्हणाले की, पूर्वी ५० ते ६० दिवस पाऊस पडत असे. आता फक्त ३५-४० दिवस होत आहेत.