Monsoon Update: पंजाबरावांचा 11 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज आला रे…!! राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचं थैमान कायम, वाचा संपूर्ण अंदाज

Monsoon Update: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने (Monsoon) काल रविवारी राज्यात दमदार हजेरी लावली. राजधानी मुंबई तसेच कोकणात, मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा मध्ये देखील काल पावसाच्या (Monsoon News) मुसळधार ते अति मुसळधार धारा बघायला मिळाल्या.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की रविवारी मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक भागात मुसळधार पावसाचे (Rain) थैमान बघायला मिळाले. याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यात देखील हलका पाऊस झाला, एवढेचं नाही तर मराठवाड्यातील जालना शहरात दुपारी तीनच्या सुमारास जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली.

भारतीय हवामान विभागाने आज सोमवारी देखील राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. आज भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विशेषता घाट परिसरात तूरळक अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाव म्हणजेच परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी आपल्या सुधारित हवामान अंदाजात 11 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज वर्तवला आहे.

पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, आज उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. याशिवाय आज पासून 11 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वत्र मात्र भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

11 ऑगस्ट पर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपली आपल्या शेतपिकाची तसेच पशुधनाची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे. पावसाचे वातावरण तयार होताचं शेतकरी बांधवांनी आपले घर जवळ करावे असा सल्ला देखील यावेळी पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना दिला आहे.