Mushroom Farming : भावांनो नोकरीं सोडा…! ‘या’ जातीच्या मशरूमची शेती करा, लाखों कमवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mushroom Farming : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) बाजारपेठेत ज्या पिकांची अधिक मागणी आहे त्याच पिकांची शेती (Agriculture) करत असल्याचे चित्र आहे.

म्हणजेच शेतकरी बांधव आता बाजारात जे विकेलं तेच पिकेल या मंत्राचा वापर करत आहेत. दरम्यान भारतातील स्वयंपाकघरात मशरूमची (Mushroom Crop) मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच आता बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच मशरूमच्या लागवडीकडे वळत आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण देखील मशरूम शेती मधील एका महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. मित्रांनो आज आपण मशरूमच्या काही प्रगत जाती जाणून घेणार आहोत. आपल्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो की, जगात मशरूमच्या 2000 पेक्षा जास्त जाती आढळल्या तरी भारतात काही जातीच्या (Mushroom Variety) मशरूमचा वापर सर्वाधिक आहे. यामध्ये व्हाईट बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम, मिल्की मशरूम, क्रेमिनी मशरूम, शिताके मशरूम आणि पोर्टोबेलो मशरूम हे सर्वात प्रसिद्ध आहेत.

व्हाईट बटन मशरूम :– भारतातील सर्वात जास्त पिकवल्या जाणार्‍या मशरूममध्ये व्हाईट बटन मशरूमचे नाव अग्रस्थानी येते. याची चव तर अप्रतिम असतेच, सोबतच यामध्ये असलेले पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. भारतात भाज्यांपासून ते पिझ्झा आणि पास्तापर्यंतच्या पदार्थांमध्ये याचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो. अशा परिस्थितीत या मशरूमला बाजारात मोठी मागणी असते. यामुळे या मशरूमची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणार आहे.

ऑयस्टर मशरूम :- ऑयस्टर मशरूम ही देखील मशरूमची एक प्रगत जात असून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाते. पंखासारखा हा मशरूम तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या अंधुक दिसण्यामुळे त्याला ऑयस्टर मशरूम असेही म्हणतात. मध्य प्रदेश, बंगाल, ओरिसा, कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकरी या मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. आपल्या महाराष्ट्रात देखील या मशरूमची शेती केली जात आहे.

मिल्की मशरूम :- मिल्की मशरूमला समर मशरूम देखील म्हणतात. मिल्की मशरूम देखील बटन मशरूम सारखेच दिसते, परंतु ते इतर मशरूमपेक्षा अधिक टिकाऊ आहे. व्हिटॅमिन डीचा हे उत्तम स्रोत आहे. हेच कारण आहे की बाजारात त्याची मागणी कायम आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशातील शेतकरी इतर पिकांसह दुधाळ मशरूमची लागवड करतात. विशेष म्हणजे या मशरूमला देखील बाजारात मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत या मशरूमची शेती देखील शेतकऱ्यांना चांगला पैसा कमवून देत आहे. मशरूम शेती सुरू करण्याआधी शेतकऱ्यांना मात्र प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो.