PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांना सरकार देत आहे 15 लाख रुपये, त्वरित करा अर्ज; अशी आहे प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan FPO Yojana : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सरकार अनेक योजना आणते. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर केंद्र सरकारने शेतीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत शेतीशी निगडित व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतची मदत केली जात आहे. परंतु जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. काय आहे अट? जाणून घ्या

15 लाख रुपये मिळवायचे असतील तर करा छोटेसे काम

PM किसान FPO योजनेसाठी पात्र होण्यासाठी, FPO स्थापन करण्यासाठी कमीत कमी 11 शेतकऱ्यांनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर FPO मैदानी भागात कार्यरत असल्यास तर त्याला कमीत कमी 300 शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहिजे. तर दुसरीकडे डोंगराळ भागातील कमीत कमी 100 शेतकऱ्यांचा पाठिंबा पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला पीएम किसान एफपीओ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल. या कागदपत्रांबद्दल सांगायचे तर, त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच जमिनीची कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाइल नंबर इत्यादींची गरज पडेल.

या सोप्या पद्धतीने करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर शेतकरी उत्पादक संघटनेच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर नोंदणी आणि लॉगिनचा पर्याय येईल, त्यापैकी तुम्हाला नोंदणीचा ​​पर्याय निवडा लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, ज्यात तुम्हाला मागितलेली सर्व माहिती टाकावी लागणार आहे.
  • आता पासबुक आणि इतर कागदपत्र अपलोड करावे लागेल.
  • सगळ्यात शेवटी सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.