Successful Farmer : 55 वर्षीय महिलेचा शेतीत अभिनव उपक्रम! जैविक शेतीच्या माध्यमातून ‘ही’ महिला कमावते वर्षाकाठी 10 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer : शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीमधून लाखोंची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते. पंजाबमधील एका महिला शेतकऱ्याने (Women Farmer) देखील ही बाब सिद्ध करून दाखवली आहे.

लुधियानापासून 35 किमी अंतरावर पखोवाल हे गाव आहे, जिथे 55 वर्षीय रुपिंदर कौर राहतात. या महिलेने 4 वर्षांपूर्वी बागकाम सुरू केले. मग फळे आणि झाडे विकण्याबरोबरच या फळांवर प्रक्रिया करून उत्पादने बनवायला सुरुवात केली. रुपिंदर कौर यांनी 3 बिघे जमिनीपासून सुरुवात केली होती आणि आज ती सुमारे 15 बिघामध्ये विविध प्रकारची झाडे लावून आणि फळांचे उत्पादन विकून वार्षिक 10 लाख कमवत आहे.

रुपिंदर कौर यांच्या शेतात सुमारे 200 महोगनीची झाडे आहेत. जे की 10 वर्षांनी तयार होतील आणि त्यांना यातून प्रति झाड 15 लाखांपर्यंत नफा मिळण्याची आशा आहे. ही महिला लोकांच्या घरांवर आणि त्यांच्या गच्चींवरही बाग लावून देत आहे.

रुपिंदर आधी हिसार, हरियाणात राहत होत्या, पण काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्याच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर लुधियानाला आपल्या मामाच्या कुटुंबासोबत राहू लागल्या. रुपिंदर म्हणतात की, ‘भावाच्या मृत्यूनंतर त्या लुधियानाला शिफ्ट झाल्या. त्यांचे पती महाविद्यालयात प्राध्यापक होते, ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तीन मुले आहेत, जी अभ्यासानंतर वेगवेगळ्या राज्यात स्थायिक झाली आहेत, त्यानंतर त्यांनी स्वतः शेती (Agriculture) करण्याचा विचार केला.

रुपिंदर म्हणतात की, ‘घरात एकट बसून त्यांना कंटाळा यायचा. त्यांच्या माहेरी 75 बिघे जमीन होती, जीं की करारावर दिली होती, पण जेव्हा त्यानी स्वतः शेती करण्याचा विचार केला तेव्हा माहेरची सर्व जमीन त्यांनी परत घेतली. मग त्यांनी माहेरी असलेल्या 75 बिघा जमीनपैकी 3 बिघामध्ये बागकाम करायला सुरुवात केली, बाकीच्या जमिनीत सेंद्रिय शेती (Organic Farming) सुरु केली. गुलाब लागवडीपासून सुरुवात केली, त्यानंतर त्याच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवण्यास सुरुवात केली.

रुपिंदर सांगतात की, “शेतीबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हते. इंटरनेट चाळायला सुरुवात केली. कोणती वनस्पती कुठे मिळेल? कोणाची मार्केट डिमांड जास्त, या गोष्टी समजून घेतल्या. त्यांनी त्यांच्या पतीकडून तीन लाख रुपये घेऊन शेती सुरू केली. त्या सांगतात, की “गुलाबाच्या लागवडीनंतर हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथून सफरचंदाची 250 रोपे आणली, पण पहिले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

वर्षभर शेतात वेगवेगळे प्रयोग केलेत. शेतात विविध जातींची रोपे लावलेत. मोकळ्या पडलेल्या जागेत त्यांनी मोहरी, कडधान्ये, नाचणी, भुईमूग, काळा-पांढरा हरभरा, ऊस, बाजरी, गहू आदी पिकांची लागवड सुरू केली. त्यांनी बासमती तांदूळ आणि काळ्या गव्हाची सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यास सुरुवात केली. ज्याची बाजारात प्रति क्विंटल किंमत 12 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत आहे.

रुपिंदर कौर देखील टिश्यू डेट पामची लागवड करतात, ज्यापासून एका झाडापासून सुमारे एक क्विंटल खजूर मिळतात आणि याचा बाजारभाव 15 हजार प्रति क्विंटल आहे. ती म्हणते, ‘राजस्थानमधील ड्रॅगन फ्रूट आणि टिश्यू डेट्स, उत्तर प्रदेशातील प्लम्स, पंजाब अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीचे टेंगेरिन, बाबूघोष, नाशपाती, केळी, लिंबू, पपई, हिमाचलमधील एवोकॅडो, अंजीर, आवळा, बेल, जॅकफ्रूट आणि कॅलिफोर्निया मधून बदाम वनस्पती मागविण्यात आले आहेत.

रुपिंदर यांच्या मते, “पहिल्या सफरचंद पिकाच्या नुकसानीतून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. खरं तर, त्यावेळी त्या कुशल शेतकरी नव्हत्या अन कुशल लेबर देखील नव्हत्या. खरं तर, रोपाला कीटकनाशके न टाकल्यामुळे त्यांचे पीक उद्ध्वस्त झाले असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानंतर त्यांनी स्वत: सेंद्रिय खत बनवण्याचा निर्णय घेतला. गायी, मेंढ्या, शेळ्या पाळण्यास सुरुवात केली. काम करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

फळांच्या रोपांची विक्री करण्याबरोबरच रुपिंदर फळांवर प्रक्रिया करून त्यापासून उत्पादने तयार करून विकतात. ती म्हणते, “जेव्हा मला वाटले की फळे थेट बाजारात विकण्यापेक्षा उत्पादन विकणे अधिक फायदेशीर आहे, तेव्हा मी ते उत्पादन बनवून विकण्यास सुरुवात केली. गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद व्यतिरिक्त, मी चहाची पाने, लिंबू चणे, गिलॉय, चाय मसाला, पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पावडर, आवळा कँडी, त्याच्या वाळलेल्या पानांपासून आंब्याचे पापड यांसारखे पदार्थ विकते. रुपिंदर म्हणते, ‘आता ते माझे पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही बनले आहे’.