शेतकऱ्याचा नांद नाही करायचा…! 150 जांभळाच्या झाडातून मिळवलं तब्बल 30 लाखांचं उत्पन्न, शेतकरी कुटुंबाची राज्यात चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. शेती व्यवसायातील नाना प्रकारची आव्हाने पाहून आता नवयुवक शेतकरी पुत्र देखील शेतीपासून दुरावत चालले आहेत. मात्र विपरीत परिस्थितीत सुद्धा योग्य नियोजनाची सांगड घातली तर शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न (Farmers Income) कमावले जाऊ शकते.

जालना जिल्ह्यातील (Jalna) भोकरदन तालुक्याच्या मौजे सुरंगळी येथील सपकाळ कुटुंबाने काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत जांभूळ फळबाग लागवड (Jamun Farming) करून अवघ्या तीन एकरात तीस लाखांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. सकाळ कुटुंबाने आपल्या तीन एकर क्षेत्रात दीडशे जांभळाची झाडे लावून तब्बल तीस लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत सपकाळ कुटुंबाची मोठी चर्चा रंगली आहे.

सध्या सपकाळ कुटुंबाने उत्पादित केलेले जांभूळ संपूर्ण राज्यात विक्रीसाठी पाठवले जात असून राज्यभर सपकाळ कुटुंबाच्या जांभळाचा गोडवा पसरला आहे. फक्त जांभळाच्या दीडशे झाडातून 30 लाखांची कमाई केली असल्याने सपकाळ कुटुंबाचा हा शेतीतला प्रयोग पंचक्रोशीत मोठ्या कौतुकाचा विषय ठरला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे सुरंगळी येथील कौतिकराव विठ्ठल सपकाळ आणि त्यांच्या बंधूंनी 2008 मध्ये जांभूळ ची दीडशे झाडे लावली.

आपल्या तीन एकर क्षेत्रात या सपकाळ बंधूंनी पुणे जिल्ह्यातील बारामती येथून आणलेली जांभळाची रोपे लावली. वीस बाय तीस या अंतरावर जांभळाचे रोपे लावण्यात आली. जांभळाची यशस्वी लागवड करण्यात आली मात्र गावातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी सपकाळ कुटुंबाच्या या प्रयोगावर प्रश्नचिन्ह उभा केला. मात्र निश्चयाचे महामेरू सपकाळ कुटुंब लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अहोरात्र जांभूळ शेतीसाठी झटू लागले. अहोरात्र काबाडकष्ट करून सपकाळ कुटुंबांनी जांभूळ बागेची जोपासना केली.

मध्यंतरी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने  जांभूळ बागेची जोपासना कशी करायची असा प्रश्न सपकाळ कुटुंबापुढे उभा राहिला. मात्र सपकाल कुटुंबाने यावर तोडगा काढत 2016 मध्ये आपल्या शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जुई धरणालगत विहीर खोदून तिथून पाईपलाईनचे पाणी आपल्या शेतात आणले. पाण्याचा प्रश्न सपकाळ कुटुंबाने मिटवला मात्र जांभूळ शेतीतून प्राप्त होणारे उत्पादन खूपच तोडके असल्याने अनेकांनी सपकाळ कुटुंबांना जांभूळ बाग काढून टाकण्याचा सल्ला दिला.

मात्र आता गेल्या दोन वर्षांपासून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली जांभूळ बाग बंपर उत्पादन देण्यास तयार झाली आहे. यावर्षी गेल्या पंधरा दिवसांपासून जांभूळ बागेतून उत्पादन मिळत आहे. या दीडशे झाडातून सपकाळ कुटुंब दररोज दहा क्विंटल जांभूळ राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवत आहेत. सपकाळ कुटुंबांनी उत्पादित केलेल्या जांभूळ चांगल्या दर्जाचे असल्याने व्यापारी देखील मोठ्याप्रमाणात जांभूळ खरेदीसाठी सपकाळ कुटुंबांकडे येत आहेत.

सपकाळ कुटुंबाच्या मते आत्तापर्यंत पाच वेळा त्यांच्या जांभूळ बागेची हार्वेस्टिंग झाली आहे. यातून त्यांना आतापर्यंत 14 लाखांचे उत्पन्न मिळाले असून अजून जांभूळ शिल्लक असल्याने त्यांना एकूण 30 ते 35 लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. सपकाळ कुटुंबाला जांभूळ शेती साठी आत्तापर्यंत पाच लाखांचा खर्च आला आहे म्हणजेच त्यांना 26 ते 27 लाख रुपये निव्वळ नफा जांभूळ शेतीतून राहणार आहे. निश्चितच सपकाळ कुटुंबाने शेतीमध्ये केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला असून इतर शेतकऱ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार आहे.