Wheat Crop Management: जिरायत गहू पिकाचे नियोजन आहे का? तर वापरा ‘या’ टिप्स, जमिनीत टिकून राहिल ओलावा! मिळेल बंपर उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Crop Management:- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये खूप कमी प्रमाणावर पाऊस झालेला आहे. नुकतेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून त्यासंबंधीचे नियोजन देखील करण्यात येत आहे. कमी पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामाला बसल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे व त्यासोबतच रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन देखील घटण्याचा  एक अंदाज आहे.

विशेष म्हणजे रब्बी हंगामातील एकूण लागवड क्षेत्रात देखील घट होण्याची भीती आहे.तरीदेखील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काही ठिकाणी शेतकरी बंधू रब्बी हंगामाची तयारी करताना आपल्याला दिसून येत आहे. रब्बी हंगामामध्ये गहू तसेच हरभरा इत्यादी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु यावर्षी पाण्याची कमी उपलब्धता असल्यामुळे पाणी पिकांना उपलब्ध होईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही.

त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये किंवा जिरायत पद्धतीने पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. याकरिता जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण जिरायत व कमीत कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये जर गहू पीक घेत असाल तर जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कुठल्या टिप्स उपयोगी पडतील हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 रब्बी हंगामामध्ये विविध पिकांसाठी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वापरा या टिप्स

1- जेव्हा आपण कुठल्याही पिकाची लागवड करतो व त्यानंतर पीक उगवते. उगवल्यानंतर आपल्याला काही दिवसांनी कोळपणी करणे गरजेचे असते. कोळपणीमुळे तण नष्ट होते व जी काही ओल वाया जाते ती थांबवणे आपल्याला शक्य होते. त्यामुळे कोळपणी करणे गरजेचे आहे. कोळपणी करताना पीक जेव्हा तीन आठवड्यांचे होईल तेव्हा करावे. कोळप्यामुळे जमीन भुसभुशीत होते व मातीचा थर चांगला बसून जमिनीतील ओलावा टिकण्यास मदत होते.

2- तसेच रब्बी हंगामातील जिरायत गव्हामध्ये आच्छादनाचा वापर केला तर पाण्याचे किंवा ओलाव्याचे बाष्पीभवन थांबवता येते तसेच तणाचा देखील बंदोबस्त करण्यास मदत होते. पिकाला अच्छादनाकरिता भाताचे काड किंवा भुसा,तूर काट्यांचा भुसा तसेच पिकांचे धसकटे, वाळलेले गवत इत्यादींचा वापर करून तुम्ही आच्छादन करू शकतात. याकरता तुम्ही हेक्टर साठी चार ते पाच टन आच्छादनाचा वापर करणे गरजेचे आहे.

जितक्या लवकर तुम्हाला पिकामध्ये आच्छादन करता येईल तितके ते फायद्याचे ठरते. साधारणपणे यामध्ये पीक चार ते पाच आठवड्यांच्या होण्याच्या अगोदर तुम्ही आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनाचा वापर केल्यामुळे पिकाला  25 ते 30 मिलिमीटर ओलाव्याची बचत होण्यास मदत होते व त्या ओलाव्याचा फायदा पिकाला होतो. म्हणून रब्बी जिरायत गव्हास आच्छादनाचा वापर करणे म्हणजे एक संरक्षक पाणी दिल्याच्या बरोबर आहे.

3- तसेच उपलब्ध थोडेफार पाणी असेल तर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. तुम्ही जर तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकाला पाणी दिले तर जास्तीत जास्त क्षेत्र कमी पाण्यात भिजवता येणे शक्य आहे.

4- तसेच जमिनीमध्ये जर ओलाव्याचे प्रमाण कमी असेल तर त्याकरिता पोटॅशियम नायट्रेट एक टक्का प्रति लिटर पाणी या प्रमाणात पिकावर फवारणी करावे. यामुळे पानांमधील जी काही क्रिया असते ती वेगवान होण्यास मदत होते आणि पिके हे जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषण्यास सुरुवात देखील करतात.

5- याशिवाय तुम्ही पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्याकरिता केओलीन अथवा खडू पावडरचा वापर करू शकतात. याकरिता केओलीन किंवा खडू पावडर एक टक्के घेऊन तिचा फवारा पानांवर केल्यास सूर्यप्रकाश हा पानांवरून परावर्तित होतो व गहू पिकाच्या आतील भागातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास देखील मदत होते.

6- याशिवाय तुम्ही गहू पिकाची पेरणी केल्यानंतर 55 किंवा 70 दिवसांनी 19:19:19 या विद्राव्य खताची 200 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यास देखील खूप मोठा फायदा मिळतो.

अशा पद्धतीने जर तुम्ही या गोष्टी केल्या तर गहू किंवा इतर पिकांना खूप मोठा फायदा मिळून उपलब्ध ओलाव्यात तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता.