Reliance Jio : इतर कंपन्यांची जिओने उडवली झोप! स्वस्तात देत आहे दिवसाला 2.5GB डेटा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio : सर्व टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लॅनच्या किमती कमी करत असते. तर काही प्लॅनमध्ये खास ऑफरही देत असते. अशातच दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनेही असाच एक प्लॅन काही दिवसापूर्वी आणला आहे.

ज्याची किंमत 349 रुपये इतकी आहे. जर या प्लॅनची तुलना इतर कंपन्यांच्या प्लॅनशी केली तर यामध्ये ग्राहकांना जास्त फायदे मिळतात. तसेच कंपनीचे इतरही काही प्लॅन्स आहेत ज्यामुळे ही कंपनी इतर कंपन्यांना कडवी टक्कर देते. जाणून घेऊयात कंपनीच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय सुविधा मिळतात.

जिओचा 349 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा नवीनतम प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5 GB डेटा मिळत आहे. त्यानुसार एकूण 75 जीबी डेटा मिळेल. ग्राहकांना देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करता येते. रोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema सारख्या अॅप्सचा मोफत प्रवेश मिळतो.

एअरटेलचा 399 रुपयांचा प्लान

कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये, कंपनी तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन वापरता येते. तसेच FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

Vodafone-Idea चा 399 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनमध्ये कंपनी 5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला प्लॅनमध्ये तीन महिन्यांचे Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. त्याशिवाय या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights यांचा समावेश आहे. हा प्लॅन Vi चित्रपट आणि टीव्हीवर विनामूल्य प्रवेश देतो.