7th Pay DA Hike : कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड ! DA वाढणार, पगारात होणार मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
7th Pay DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदची बातमी दिली जाऊ शकते. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली DA वाढ कर्मचाऱ्यांना या मार्च महिन्यात दिली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे.
देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा DA वाढ केली जाते. मात्र यावर्षी अद्याप एकदाही DA वाढ करण्यात आलेली नाही.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये होणार इतकी वाढ

केंद्र सरकारकडून मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. मार्च 2024 मध्ये कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये देखील 4 टक्के वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ होऊ शकते.
कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के दराने DA दिला जात आहे. आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आल्यानंतर 50 टक्के दराने DA दिला जाणार आहे. 50 टक्के DA झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ दिली जाणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये 4 टक्के DA वाढ करण्यात आली आहे.
किती कर्मचाऱ्यांना होणार फायदा? 
केंद्र सरकारकडून करण्यात येणार असलेल्या DA वाढीचा लाभ 48.67 लाख सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. लवकरच सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
महागाई भत्ता कधी वाढणार?
केंद्र सरकारकडून 15 मार्चपर्यंत DA वाढीची घोषणा केली जाऊ शकते. मार्च महिन्यात DA वाढ केली तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून त्याचा लाभ दिला जाणार आहे. उदारणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्यांना 9000 रुपये DA दिला जात आहे. कर्मचाऱ्यांचा पगार 2,140 रुपयांनी वाढेल.