Ajab Gajab News : व्यक्तीने फ्रीजरमध्ये लपवून ठेवले १८३ प्राण्यांचे अवशेष, पण अनेक प्राणी जिवंत.. पोलीसांकडून धक्कादायक प्रकार उघड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : अमेरिकामध्ये (America) एक धक्कादायक (Shocking) प्रकार घडला असून यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने विकृत प्रकार केला आहे.

हा प्रकार अमेरिकेतील अॅरिझोना (Arizona) येथे घडला असून एका व्यक्तीने आपल्या गॅरेजच्या फ्रीजरमध्ये (Freezer) १८३ प्राण्यांचे अवशेष लपवून ठेवले होते. त्यात कुत्रा, ससा या प्राण्यांच्या अवशेषांचा समावेश आहे. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या प्रकरणी पुरुषाविरुद्ध प्राणी क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही प्राणी फ्रीजरमध्ये जिवंत ठेवले

रिपोर्टनुसार, काही प्राणी फ्रीजरमध्ये व्यक्तीने जिवंत ठेवले होते. त्यामुळे थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. शेरीफच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मोहावे काउंटीचे अधिकारी आणि प्राणी नियंत्रण अधिकाऱ्यांना ३ एप्रिल रोजी गॅरेज फ्रीझरमध्ये प्राण्यांचे अवशेष सापडले.

एका महिलेने तक्रार केली की ४३ वर्षीय मायकेल पॅट्रिक टरलँडने तिचे साप परत केले नाहीत. हे साप त्यांनी प्रजननासाठी त्यांच्याकडे मागितले होते. हा फ्रीझर गोल्डन व्हॅली, अॅरिझोना येथील माणसाच्या जुन्या घराच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आला होता.

अहवालानुसार, त्या व्यक्तीने कुत्रे, कासव, सरडे, पक्षी, साप, उंदीर आणि ससे यांसारख्या प्राण्यांचे अवशेष फ्रीजरमध्ये ठेवले होते. यातील अनेक प्राणी जिवंत गोठलेले दिसत होते.

पोलिसांनी अटक केली

जेव्हा घराच्या मालकाने टरलँड आणि त्याच्या पत्नीला घर रिकामे करण्यास सांगितले. यानंतर साफसफाई करताना गोठलेल्या जनावरांची माहिती मिळाली. यानंतर घरमालकाचे होश उडाले. त्यानंतर टरलँडला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. शक्तीशी चौकशी केली असता, टरलँडने काही प्राणी फ्रीझरमध्ये जिवंत ठेवल्याचे कबूल केले.