Ajab Gajab News : काय सांगता..! पाकिस्तानमध्ये चक्क 5 गाढवांना केले न्यायालयात हजर, केला होता ‘हा’ अजब गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : तुम्ही कधी ऐकले आहे की, प्राण्यालाही न्यायाधीशांसमोर हजर केले जाते. होय, हे पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडले आहे. एका विचित्र घटनेत, लाकूड तस्करीच्या प्रकरणात पाच गाढवांना (Donkeys) चित्राल येथील सहायक आयुक्तांसमोर हजर करण्यात आले.

चित्रालच्या द्रोश भागात लाकूड (Wood) तस्करीत सहभागी असल्याच्या आरोपावरून या गाढवांना पोलिसांनी (Police) आधी ताब्यात घेतले आणि नंतर सहाय्यक आयुक्त तौसीफुल्ला यांच्या न्यायालयात हजर केले.

लाकूड तस्करी प्रकरणात सहाय्यक आयुक्तांनी (Assistant Commissioner) या पाच गाढवांना मालमत्ता म्हणून बोलावले होते. समाधानकारक तपासणी केल्यानंतर गाढव आणि लाकडी स्लीपर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही गाढवे सुरक्षित असून ती कोणाच्याही ताब्यात देण्यात आलेली नाहीत, असे सहायक आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, गाढवांचा आता तस्करीसाठी वापर केला जात नाही. गाढवे संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याने न्यायालयाचे समाधान झाले. वास्तविक एक-दोन लाकडाचे तुकडे गाढवावर बांधलेले असतात.

लाकूड पोचवण्यासाठी गाढवे वापरले

विशेष म्हणजे ही गाढवे अत्यंत हुशार होती, कारण ते स्वतःहून योग्य ठिकाणी लाकडाची तस्करी करत होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात वनविभागाचा कर्मचारी उमर शाह आणि त्याचा साथीदार इम्रान शाह (चेक पोस्ट गार्ड) यांना माखनियाल परिसरातील जंगलातून मौल्यवान लाकडाची तस्करी करताना अटक करण्यात आली होती.

नंतर त्याला निलंबित करण्यात आले. उमर शाह माखनियाल परिसरातील हरिपूर येथे ब-याच काळापासून देवदाराची मौल्यवान लाकूड आणि अबीज (चीअर) जातीची झाडे चोरून विकत होता.