अजित पवारांनी दिला एमआयडीसी मंजूर करण्याचा शब्द !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अकोले तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले.

अगस्ती साखर कारखान्याच्या बाबतीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार यांच्यासह ही संस्था बंद न पडता चालूच राहील, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द अजित पवार यांनी मला दिला.

मंगळवारी मंत्रालयात मी विविध विभागाच्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, अशी माहिती आमदार डॉ. किरण लहामटे

यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहावर स्वतंत्रपणे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आमदार डॉ. लहामटे म्हणाले,

अगस्ती साखर कारखान्याचा अगामी गाळप हंगाम सुकर करण्याबाबत व तालुक्यातील विविध विकासाच्या प्रश्नांवर अजित पवार,

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यावर ठोस मार्ग निघाले. तालुक्यातून ३२ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव आर्थिक मदत करण्याचाही शब्द पवार यांनी दिला.