एलन मस्क यांची संपत्ती एका झटक्यात ३० अब्ज डॉलरांनी घटली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या एलन मस्क यांची संपत्ती ३०४ अब्ज डॉलरवर पोहचली होती, पण काही दिवसांपासून टेस्लाचे शेअर ढासळलेतं. त्यामुळे मस्क यांची एका झटक्यात संपत्ती ३० अब्ज डॉलरांनी कमी झाली आहे.

नव्या वर्षाची सुरुवात एलन मस्क यांची चांगली झाली. टेस्लाचे शेअर रॉकेट सारखे वरती गेले. बघता बघता संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली, पण हा आकडा लगेच खाली आला.

म्हणजेच, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी ३० अब्ज गमावले. या घसरणीनंतर टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क आता अंदाजे २७१.५ अब्ज डॉलरचे मालक आहेत.

सोमवारी टेस्लाचे शेअरमध्ये १३.५ टक्क्यांनी वाढ झाली, त्यामुळे एलन मस्कच्या संपत्तीत वाढ झाली. पण मंगळवारपासून गुरुवार दरम्यान त्यांचे शेअर ढासळले.

यात सगळ्यात जास्त घसरण ही बुधवारी झाली. एका दिवसात एलन मस्क यांच्या संपत्ती १४ अब्ज डॉलरनी कमी झाली. वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी मस्क यांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली होती आणि ती एका दिवसात ३०४ अब्ज डॉलर वर गेली.

मस्क यांची एकूण संपत्ती एका दिवसात ३३.८ अब्ज डॉलर, सुमारे २,५१,७१५ कोटी रुपयांनी वाढली. जे आता २७१.५ अब्ज डॉलरवर आली आहे.