अनिल देशमुख यांची संपत्ती ईडीने परत करावी, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही; रुपाली पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली आहे.

तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर ईडीकडून (ED) त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता आणील देशमुख यांना कोर्टाने (Court) दिलासा दिला आहे.

याबाबत राष्ट्रवादीच्या (Ncp) पुण्यातील फायर ब्रँड नेत्या रुपाली पाटील (rupali patil) यांनीही फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी कायद्यापुढे कोणीही मोठा नसून ईडीला मोठा दणका दिल्याचे म्हटले आहे.

रुपाली पाटील यांची पोस्ट

कोर्टाच्या निर्णयानंतर रुपाली पाटील यांनी पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा ईडीला दणका. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची व कुटुंबाची ED ने जप्त केलेली सर्व संपत्ती अनिल देशमुख यांना परत करावी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. जय संविधान. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, ईडीने देशमुख यांना अटक करतानाच त्यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी मारून त्यांच्या एकूण ११ मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने आता महत्त्वाचे आदेश देतानाच ईडीला फटकारले असून त्यांच्या सर्व मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिले.