Basil Farming : शेतकरी मित्रांनो लखपती बनायचं का? मग करा या पिकाची शेती आणि बना मालामाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- भारत एक शेतीप्रधान देश (Agricultural country) आहे, कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर (Agricultural Sector) अवलंबून आहे.

देशातील बहुसंख्य लोक आपला उदरनिर्वाह शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर करीत आहेत. यामुळे देशाची जीडीपी सुधारण्यासाठी शेतीक्षेत्र पुढे आणणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली तरच देशाच्या जीडीपीत वाढ शक्य असल्याचे अर्थतज्ञ यांचा दावा आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmers) सल्ला देत नेहमीच शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करण्याचा सल्ला देतात.

जाणकारांच्या मते शेतकऱ्यांनी काळाच्या ओघात पीक पद्धतीत बदल (Cash Crop) केला तर निश्चितच त्यांना यातून फायदा होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा तसेच देशाचा देखील विकास शक्य होणार आहे. आज आपण पारंपरिक पिकांची माहिती न घेता तुळशीच्या शेती (Basil Cultivation) विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

तुळशी ही एक औषधी वनस्पती (Medicinal plant Basil) आहे ज्याचे देठ, फूल, पान, मूळ आणि बिया कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरल्या जातात.

तुळशी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे तुळशीची मागणी बाजारात कायम असते विशेषता कोविड-19 नंतर तुळशीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

आजही अनेक लोक आयुर्वेदिक चिकित्सावर विश्वास ठेवतात यामुळे तुळशीच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुळशीच्या शेतीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याची शेती सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही.

तसेच तुळशीचे पीक तीन महिन्यांतचं काढणीसाठी तयार होत असते. यामुळे याच्या शेतीसाठी खुपच कमी कष्ट घ्यावे लागतात. आजकाल अनेक आयुर्वेदिक औषध तयार करणाऱ्या कंपन्या सुद्धा तुळशीची कंत्राटी शेती करून घेत आहेत.

कशी करणार तुळशीची शेती शेतकरी मित्रांनो जर आपणास तुळशीची शेती करायची असेल तर आपणास याची रोपे शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून आणावी लागणार आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा कि तुळशीच्या प्रगत जातींचीच लागवड आपल्याला करावयाची आहे.

कृषी तज्ञांच्या मते, तुळशीची रोपे लावण्यासाठी एप्रिल महिना सर्वात योग्य आहे या महिन्यात तुळशीची शेती सुरू केल्यास निश्चितच दर्जेदार उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. अनेक कंपन्या तुळशीची कंत्राटी शेती करतात. अशा कंपन्या तुळशीची रोपे शेतकऱ्याला उपलब्ध करून देतात. याची शेती गोट तयार करून आणि सपाट शेतात देखील करता येते.

गोट तयार करून लागवड केल्यास सिंचन करताना पाण्याची बचत होते. गोट वर झाडे लावल्यास गोट ते गोट अंतर दोन फूट आणि रोपापासून रोपाचे अंतर देखील दोन फूट ठेवावे. तुळशीची रोपे कोरडवाहू जमिनीत लावली जातात, त्यामुळे रोपे लावल्यानंतर लगेच पहिले पाणी द्यावे. तुळशीच्या झाडांना वर्षभरात 10 ते 12 पाणी द्यावे लागते.

केवळ तीन महिन्यात उत्पादनास तयार होतं पीक तुळशीची रोपे लागवड केल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी काढणीसाठी तयार होतात. जेव्हा झाडे फुलतात आणि खालची पाने सुकतात तेव्हा त्याची कापणी केली जाते. त्याच्या कापणी केलेल्या वनस्पतींमधून तेल काढले जाते. एक हेक्टर तुळशीच्या शेतातून 20 ते 25 टन उत्पादन मिळते. काही कंपन्या त्याची पाने आणि फांद्या स्वतंत्रपणे विकत घेतात. तर काही तेलासाठी संपूर्ण वनस्पती खरेदी करतात.

तुळशीची कापणी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. याची झाडे मुळाजवळ कापली जात नाही,तर वरून कापली जातात. असे करण्याचे कारण असे की तुळशीचे रोप एकदा लावल्यानंतर तीन वर्षे यापासून उत्पादन घेता येते. वरून कापल्यामुळे, वनस्पती पुन्हा रूट घेते. अशाप्रकारे तुळशीच्या रोपाची वर्षभरात तीनदा काढणी केली जाते. हिवाळ्यात तुळशीची वाढ मंदावते.

तुळशीच्या शेतीचे आर्थिक गणित साधारणपणे एका एकरात तुळस पिकवण्यासाठी 20 हजार रुपये खर्च येतो. तुळशीचे रोप एकदा लावल्यानंतर तीन वर्षे वाढू शकते. तुळशीचे रोप वर्षातून तीनदा काढले जाते. तुळशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभरात तीन लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळते. एखाद्या शेतकऱ्याने प्रक्रिया युनिट उभारून मूल्यवर्धन करून आपला माल विकला तर उत्पन्न अजून वाढू शकते.