Beer Benefits : बिअर पिल्याने शरीरापासून दूर होतात ‘हे’ आजार ; जाणून घ्या थंडगार बिअर किती आणि केव्हा प्यायची..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beer Benefits : आज बिअर (beer) हे सर्वात आवडते पेय मानले जाते यात शंका नाही. तुम्ही पाहिले असेलच की, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना थंडगार बिअर पिणे खूप आवडते.

हे पण वाचा :- Bank Privatization : मोठी बातमी ! पुढील वर्षभरात ही ‘सरकारी’ बँक होणार पूर्णपणे खासगी ; ‘ही’ आहे संपूर्ण योजना

काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. पण, जर तुम्हाला असे वाटत असेल तर ते चुकीचे असेल. कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण रोज किती बिअर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिअरमध्ये अल्कोहोलचे (alcohol) प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बिअर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो.

तणाव दूर करण्यासाठी

अल्कोहोल हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असल्याचं म्हटलं जातं, पण बिअरबाबतच्या अनेक संशोधनांमध्ये ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर तुम्ही बिअरचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतील. काही संशोधनात असे म्हटले आहे की बिअर पिल्याने तणाव, चिंता आणि थकवा या समस्या दूर होतात. परंतु बिअर 350 मिलीग्रामपेक्षा जास्त खाऊ नये.

हे पण वाचा :- Mobile Recharge : महागाईत दिलासा ! ‘ही’ कंपनी देत आहे ‘इतक्या’ स्वस्तात दररोज 2GB डेटासह खूपकाही ..

किडनी स्टोनमध्ये फायदेशीर

पुष्कळ लोक म्हणतात की जर तुम्हाला मुतखड्यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर तुम्ही बिअरचे सेवन करू शकता. बिअर प्यायल्याने स्टोन फुटतो आणि लघवीद्वारे बाहेर पडतो. म्हणूनच अनेक लोक किडनी स्टोन झाल्यानंतर बिअर पिण्याची शिफारस करतात.

अल्सरमध्ये आराम देते

काही संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 75 मिलीग्राम बिअरचे सेवन केल्याने अल्सरच्या समस्येत खूप आराम मिळतो. पण बिअर फक्त मर्यादित प्रमाणातच प्यायली पाहिजे, त्याचे जास्त सेवन करणे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

हे पण वाचा :- PPF Withdrawal: आता तुम्ही सहज काढू शकता PPF मध्ये जमा केलेले पैसे ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया