भावा नांदच खुळा..!! इंजीनियरिंग केली पण नोकरीं न करता सुरु केला डेरी फार्मिंगचा व्यवसाय; आज करतोय तब्बल 7 कोटींची उलाढाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

succes story : मित्रांनो भारतात फार पूर्वीपासून शेती व्यवसायासोबत (Farming) पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर (Livestock Farmers) देखील सिद्ध होतं आहे. या व्यवसायातून शेतकरी बांधव अल्पकालावधीच चांगला बक्कळ पैसा कमवित आहेत.

मित्रांनो देशात असे अनेक पशुपालक शेतकरी आहेत जे कि डेरी फार्मिंगच्या Dairy Farming Business) व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहेत. आज आपण राजस्थान मधील अशाच एका अवलिया पशुपालक शेतकरी विषयी जाणून घेणार आहोत.

राजस्थानमध्ये वास्तव्यास असलेला हा अवलिया पशुपालक शेतकरी पशुपालन व्यवसायातून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी अमनप्रीत यांनी उच्चशिक्षित असून देखील पशुपालन व्यवसाय सुरू केला.

विशेष म्हणजे पशुपालन व्यवसायातून त्यांनी वर्षाकाठी सात कोटी रुपयांची उलाढाल करण्याची किमया देखील साधली आहे. खरं पाहता अमनप्रीत इंजिनियर आहेत. मात्र ते आज गायी पालणाचे काम करत आहेत. विशेष म्हणजे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याऐवजी गावी जाऊन शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याची स्वप्न बघितले.

मग काय 6 वर्षांपूर्वी इंजीनियरिंग झाली आणि पट्ठ्या गावी परतला आणि 25 गायींसह दुग्धव्यवसाय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज अमनप्रीत यांच्याकडे एकूण 300 गायी आहेत. ते त्यांनी उत्पादित केलेले तूप देशभरात विकतात. त्यांच्याकडे आजच्या घडीला दीडशेहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

अमनप्रीत 31 वर्षाचे आहेत. अमनप्रीत यांनी आपल्या व्यवसायाची माहिती देतांना सांगितले की, त्यांचं त्यांच्या गावाशी नेहमीच एक जिव्हाळ्याच नातं राहील आहे, त्यामुळे त्यांना गाव सोडून शहरात जाऊन नोकरी करायची नव्हती. मग काय इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (NDRI) कर्नालमधून मास्टर्स केलं.

त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी परदेश वारी देखील केली. त्यावेळी त्यांनी शेती व्यवसायात प्रगत असलेल्या इस्रायल देशाची विदेश वारी केली आणि तेथून दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांना अमूलमध्ये नोकरी मिळाली, त्यानंतर त्यांनी काही वर्षे नेस्लेमध्येही काम केले.

या दरम्यान त्याला दुग्धव्यवसायाबद्दल खूप काही शिकायला मिळाले. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी दुग्ध व्यवसायातील सर्व बारकावे आत्मसात करून घेतले. विशेष म्हणजे दुधावर प्रक्रिया कशी केली जाते तसेच त्याची मार्केटिंग कशी केली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती त्यांना नोकरीदरम्यान मिळाली.

2016 मध्ये भावासोबत दुग्धव्यवसाय सुरू केला
अमनप्रीत सांगतात की, त्यांनी त्याच्या भावासोबत 2016 मध्ये गौ ऑरगॅनिक नावाचा स्टार्टअप सुरू केला. या मध्ये त्यांनी पहिले उत्पादन बनवले होते बिलौना तूप. बिलौना तूप सर्वात शुद्ध आणि आरोग्यदायी मानले जाते.

ते तयार करण्यासाठी आधी दूध गरम केले जाते, नंतर दही सेट केले जाते आणि तूप मंथन करून तयार केले जाते. हे एक पारंपारिक तूप आहे आणि त्याची मागणी जास्त आहे, परंतु ते तयार करणारे लोक कमी आहेत. यामुळे त्यांनी तयार केलेल्या बिलोना तुपाला चांगली मागणी असल्याचे अमनप्रीत सांगतात.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून केली मार्केटिंग
अमनप्रीत अधिक माहिती देताना सांगतात की जेव्हा त्यांनी त्यांचे उत्पादन लॉन्च केले आणि आजूबाजूच्या लोकांना ते दिले तेव्हा त्यांना ते खूप आवडले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंगचे नियोजन केले. काही दुकाने उघडली, किरकोळ विक्रेत्यांशी करार केला.

त्यानंतर Amazon, Flipkart सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू केली. हळूहळू मागणी वाढली आणि त्यानुसार अमनप्रीत यांनी उत्पादनही वाढवले. यासोबतच गायींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या त्यांना दररोज 100 किलो तुपाची ऑर्डर मिळत असल्याचे सांगितले जातं आहे.

अमनप्रीत सांगतात की, सध्या 70 शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या घरातील महिलावर्ग देखील या व्यवसायात सामील झाल्या आहेत. या लोकांना तूप आणि खत बनवण्याचे प्रशिक्षण अमनप्रीत यांनी दिले आहे. हे लोक अमनप्रीत साठी दोन्ही उत्पादने तयार करतात आणि अमनप्रीत त्यांची मार्केटिंग स्वतः करतो. निश्चितच अमनप्रीत यांनी मिळवलेले हे यश नेत्रदीपक असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.