BSNL Offer : BSNL च्या ‘या’ प्लॅनपुढे जिओही फेल, 3GB डेटासह सर्वकाही मिळवा मोफत, किंमत आहे…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Offer : बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी सतत इतर खासगी कंपन्यांना टक्कर देत असते. या प्लॅनच्या किमतीही इतर कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत खूप कमी असतात. असाच एक प्लॅन आता कंपनीने आणला आहे. ज्याची किंमत 199 रुपये इतकी आहे.

कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटासह सर्वकाही विनामूल्य देत आहे. इतकेच नाही तर कंपनी आपल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना इरॉस नाऊ सबस्क्रिप्शनही अगदी मोफत देत आहे. काय आहे कंपनीचा हा प्लॅन जाणून घ्या,

आता आपल्या ग्राहकांसाठी बीएसएनएलने एक जबरदस्त प्लॅन आणला आहे ज्यात यूजर्सना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची वैधता दिली जाणार आहे. तसेच या प्लॅन मध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटाही दिला जाणार आहे. BSNL ही कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी जबरदस्त दीर्घकालीन योजना ऑफर करत असते. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 2998 रुपये असून ज्यामध्ये 455 दिवसांची दीर्घ वैधता दिली जाणार आहे.

या सुविधा मिळणार

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB इंटरनेट डेटा दिला जात आहे. तसेच हा डेटा संपल्यानंतर, त्याची गती 40Kbps पर्यंत कमी होते. इतकेच नाही तर यात तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधा आणि इरॉस नाऊ सबस्क्रिप्शनही अगदी मोफत दिले जाणार आहे.

किती आहे मासिक किंमत

कंपनीच्या या प्लॅनची जर तुम्हाला मासिक किंमत जाणून घ्यायची असल्यास या प्लॅनची मासिक किंमत 199 रुपये इतकी आहे. कंपनीचे ग्राहक फक्त दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हे लक्षात ठेवा की जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना उपलब्ध असणार आहे.