Business Idea 2023 : नोकरीपेक्षा मिळणार जास्त पैसे! सरकारी मदत घेऊन सुरु करा हा व्यवसाय, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea 2023 : केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा फायदाही सर्वसामान्यांना होत आहे. यापैकी एक योजना म्हणजे मुद्रा योजना होय. सरकार व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांना या योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते.

त्यामुळे जर तुम्हाला आता तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही आता सरकारी मदत घेऊन पापड व्यवसाय सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाला खूप मागणी आहे. त्यामुळे तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

या व्यवसायातून तुम्हाला भरपूर कमाई करता येईल. इतकेच नाही तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ मिळू शकतो. या अंतर्गत तुम्हाला व्याजदरावर 4 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

या मशीन्सची असणार आवश्यकता

तुम्हाला पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर, तुम्हाला स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलन्स, इलेक्ट्रिकली ओव्हन, मार्बल टेबल टॉप, चकला बेलान, अॅल्युमिनियमची भांडी तसेच रॅक यांसारखी मशिनरी लागणार आहे.

होईल मोठी गुंतवणूक

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये लागणार आहेत. या पैशातून तुम्हाला कच्चा माल, मशीन्स आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. केंद्र सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी लोकांना मदत करत असून मुद्रा लोन अंतर्गत बँकेकडून 4 लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळू शकते.

तर तुम्हाला स्वतःला 1 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. यानंतर तुम्ही या पापड युनिटद्वारे 30,000 किलो उत्पादन करून बाजारात विक्री करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कर्जाची रक्कम 5 वर्षांच्या आत परत करता येते.

किती होणार कमाई

उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही लहान किराणा दुकाने आणि सुपर मार्केट आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधून त्याची विक्री वाढवू शकता.

एका अंदाजानुसार पापड व्यवसायातील नफा हा गुंतवणुकीच्या एक पंचमांश असतो. समजा तुम्ही या व्यवसायात 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्ही प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये कमावता येतील. यात तुमचा नफा 35 40 हजार रुपयांपर्यंत असेल.