Realme 10 Pro 5G : रियलमीचा लेटेस्ट 5G फोन खरेदी करा फक्त 999 रुपयांना, कुठे मिळत आहे संधी जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme 10 Pro 5G : रियलमी ही मार्केटमधील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. या कंपनीने अल्पावधीतच मार्केटमध्ये आणि ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनी सतत इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते.

अशातच आता या कंपनीने आपला लेटेस्ट 5G फोन Realme 10 Pro 5G लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 20,999 रुपये इतकी आहे.  परंतु, आता याच फोनवर मोठी सवलत मिळत असून फक्त 999 रुपयांमध्ये हा फोन विकत घेऊ शकता. कुठे मिळत आहे अशी भन्नाट ऑफर जाणून घेऊया.

जाणून घ्या ऑफर

6 GB रॅम सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 इतकी आहे तर 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 आहे. परंतु, फ्लिपकार्टवर मिळत असलेल्या डिस्काउंटनंतर हा फोन 18,999 रुपये आणि 19,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. तसेच या फोनच्या खरेदीवर, Flipkart Axis Bank कार्डवरून 5 टक्के सूट दिली जाईल.

प्रत्येक महिन्याला ग्राहकांना 694 रुपयांपर्यंत ईएमआयचा पर्याय दिला जाईल. इतकेच नाही तर फोनच्या खरेदीवर आकर्षक एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत. या फोनवर 18,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून फोनच्या स्थितीवर आणि कंपनीवर अवलंबून असते. तुम्हाला फोनवर पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर तुम्ही हा फोन रु.999 पर्यंत खरेदी करू शकता.

मिळत आहेत शानदार फीचर्स

Android 13 आधारित Realme UI 4.0 Realme 10 Pro 5G सह उपलब्ध आहे. कंपनीने या फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून जो (2400 × 1080 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. नंतर RAM 16 GB पर्यंत वाढवता येते.

यात प्राथमिक कॅमेरा 108 मेगापिक्सेल आणि दुय्यम कॅमेरा 2 मेगापिक्सेल आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा उपलब्ध आहे. Realme 10 Pro सह 5000mAh बॅटरी आणि 33W SuperWook फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. हा फोन 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.