Car Tips And Tricks : कारमधल्या एसीमुळे मायलेजचं गणित बिघडत? कार चालवण्यापूर्वी जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Tips And Tricks : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता सर्वजण कोणतेही वाहन खरेदी करत असताना त्याच्या मायलेजचा आधी विचार करत आहेत. प्रत्येक वाहनांचं मायलेज मेन्टेन ठेवणे अवघड काम आहे.

अशातच कारचे मायलेज हे तर कळीचा मुद्दा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात कारमधल्या एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कारमधल्या एसीचा आणि मायलेजचा काही संबंध असतो का असा अनेकांना प्रश्न पडत असतो.

खिडक्या उघडली तर मायलेजवर परिणाम होतो ?

जर तुम्ही हायवेवर जास्त वेगाने कार चालवत असल्यास आणि जर तुम्ही खिडक्या उघडल्या तर या स्थितीत बाहेरून जोराचा वारा हा तुमच्या कारच्या आतमध्ये येईल आणि तो कारला मागील बाजूस कव्हर करू शकतो.

इंजिन गाडीला पुढे ढकलू शकेल आणि या स्थितीत, कारच्या आत भरपूर इंधनाचा वापर होऊ शकतो. यामुळे तुमची कार खूपच कमी मायलेज देण्याची शक्यता आहे.

एसी वापरला तर मायलेजवर परिणाम होतो का?

जर तुम्ही गाडी चालवत असताना गाडीतील एसी चालू केला तर याचा थेट परिणाम तुमच्या कारच्या मायलेजवर पडू शकतो. हे कायम लक्षात ठेवा की जेव्हा AC सुरू होतो, तेव्हा इंजिनची शक्ती कॉम्प्रेसर फिरवण्यासाठी वापरण्यात येते.

त्यामुळे इंजिन मोठ्या प्रमाणात इंधन वापरते. हवामान नियंत्रण असणारा एसी कारमध्ये एअर कंडिशनर वापरला तर मायलेजवर फारसा परिणाम होत नाही.