दुष्काळात तेरावा महिना…! उत्पादनात घट अन कांद्याच्या दरातही घसरण, कांदा उत्पादक शेतकरी झाला बेजार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळी हंगामातील (Summer Season) कांदा काढण्यासाठी (Onion Harvesting) कांदा उत्पादक शेतकरी लगबग करताना दिसत आहेत.

नगर जिल्ह्यातही (Ahmednagar) मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले जाते या जिल्ह्यातही आता उन्हाळी कांदा (Summer Onion) काढण्याचे काम जोरावर सुरू आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड (Onion Cultivation) केली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) नोव्हेंबर महिन्यात लावल्या गेलेल्या कांद्यावर रोगराईचे सावट बघायला मिळाले. यामुळे जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर रोटर फिरवले.

त्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. कांदा लागवडदरम्यान शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीचा (Fertilizer Rate) मजूर टंचाईचा (Labour Shortage) मोठा फटका बसला आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.

मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Grower) कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळेल आणि केलेला उत्पादन खर्च काढून पदरी थोडेफार पैसे मिळतील अशी भोळी भाबडी आशा बाळगून उत्पादन खर्चात वाढ होत असली तरी महागड्या औषधांची फवारणी केले काही थांबवले नाही.

यामुळे यंदा कांद्याला नेहमीपेक्षा अधिक खर्च झाला. अखेर हजारोंचा खर्च करून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे कांदा पिकाला जोपासून शेतकरी बांधवांनी कांदा पिक काढणीसाठी तयार केले. पण, आता कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत आहेत. निसर्गाचा लहरीपणा काही कमी करतो की काय म्हणून सुलतानी दडपशाही देखील शेतकऱ्यांना जीवघेणी सिद्ध होत आहे.

शेतकरी बांधवांनी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत कांदा पिक काढणीसाठी तयार केले निसर्गाच्या लहरीपणामुळे सहाजिकच कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे असे असतानाचं आता कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र राज्यात यावेळी बघायला मिळाले. सध्या मिळत असलेल्या कवडीमोल दरात कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील मोठे मुश्किल असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.

हंगामाच्या सुरुवातीला कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत होता. परंतु कांद्याला मिळत असलेला हा बाजार भाव जास्त काळ टिकू शकला नाही आणि आता कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळू लागला आहे. सध्या कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे.

एप्रिल महिन्यात उन्हाळी कांदा जवळपास सर्वीकडे काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक बघायला मिळणार आहे.

म्हणून आगामी काही दिवसात कांद्याच्या भावात अजून मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत कांदा हा पुन्हा शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचा ठरला असून, यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे.