मंडलाधिकारी ८ हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील लाचखोर मंडलाधिकारी बाळासाहेब कचरू जाधव (वय-४५,वर्ष ,रा. -संगमनेर ) याला ०८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

एका शेतकऱ्याकडून शेत जमिन विक्रीमध्ये फेर नोंदणी करताना चूक झाली होती. ही चूक दुरुस्त करून देण्याकरिता आरोपी मंडलाधिकारी बाळासाहेब जाधव

याने शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि ८ हजार रुपये सामनापूर मंडलाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज १२ जुलै रोजी स्वीकारले.

त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

सदरची कारवाई श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक,लाचलुचपत विभाग,नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. करांडे व पथकाने केली.

तसेच लाचखोर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांची तक्रार करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो नगर येथील दूरध्वनी क्रमांक 0241 -24 236 77 व टोल फ्री क्रमांक 1064 वर नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.