Alert : 31 मार्चपूर्वीच करा ‘ही’ महत्त्वाची कामे, नाहीतर तुमच्या अडचणीत होईल वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Alert : 31 मार्चपूर्वी पैशाशी निगडित महत्त्वाची कामे करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा तुम्हाला खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. सरकारने याबाबत वेळोवेळी इशारा देण्यात आला होता.

आता 31 मार्च ही कामे करण्यासाठी शेवटची तारीख आणि मुदत आहे. 31 मार्च नंतर तुम्हाला कोणतीही मुदत दिली जाणार नाही हे लक्षात ठेवा. या कामांमध्ये तुम्हाला पॅन आधार लिंकिंग, कर नियोजन यांसारखी इतर अनेक महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत.

पॅन-आधार लिंक करणे

आधार कार्डसोबत पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत निश्चित केली आहे. हे लक्षात ठेवा की तुम्ही हे काम 31 मार्च 2023 पूर्वी कराव. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे 1 एप्रिलपासून पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल.

करा एसबीआय योजनेत गुंतवणूक

जर तुम्हाला SBI च्या नवीन FD स्कीम अमृत कलश योजनेत गुंतवणूक करून 7.6 टक्के व्याजदर मिळवायचा असल्यास तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 31 मार्चपर्यंतच वेळ आहे.

असे करा कर नियोजन

जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर तुम्ही 31 मार्चपूर्वी कर बचत योजनेत गुंतवणूक करा. हे लक्षात घ्या की जर तुम्ही असे केले, तुम्हाला कर कपातीचा लाभ मिळेल.

म्युच्युअल फंड योजनेत नामांकन

जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही आपण 31 मार्च 2023 पूर्वी नामांकन करणे खूप गरजेचं आहे. फंड हाऊसकडून सर्व गुंतवणूकदारांना 31 मार्चपूर्वी हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर तुम्ही हे काम करत नसाल तर तुमचा निधी गोठवला जाऊ शकतो.