IQOO 5G smartphone : संधी गमावू नका! खूप स्वस्तात खरेदी करता येतोय IQOO चा 5G स्मार्टफोन

जर तुम्ही स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही Amazon वर स्वस्त स्मार्टफोन विकत घेऊ शकता.

IQOO 5G smartphone ; सध्या अनेक कंपन्या आपले 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहकही शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोनच्या शोधात असतात त्यामुळे फोनच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशातच कंपन्या आता 5G स्मार्टफोन सादर करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे अनेकांना आपल्याकडेही जबरदस्त फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन असावा असे वाटते. अशातच तुम्ही आता iQOO 9 5G हा फोन 42,990 रुपयात विकत घेऊ शकता. तसेच त्यावर इतर ऑफर मिळत असल्याने तुम्ही तो आणखी स्वस्तात खरेदी करू शकता.

फीचर आणि स्पेसिफिकेशन

Advertisement

स्टोरेजचा विचार केला तर यात 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 888+ 5G प्रोसेसर दिला जात आहे. फोनमध्ये तुम्हाला 2376×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56 इंच फुल एचडी + डिस्प्ले असून जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो.

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे कंपनीकडून दिले आहेत. यात 13-मेगापिक्सेलचा वाइड अँगल आणि 48-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 13-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्सचा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4350mAh बॅटरी असून जी 120W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा असा दावा आहे की फोनची बॅटरी 6 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.

Advertisement