Poco c31 discount : अशी संधी गमावू नका! फक्त 549 रुपयांमध्ये मिळतोय ‘हा’ स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Poco c31 discount : जवळपास सगळेजण सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरत आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांकडे आपण स्मार्टफोन पाहतो. त्यामुळे मार्केटमध्येही नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. मागणी जास्त असल्यामुळे या स्मार्टफोनच्या किंमत जास्त आहेत.

त्यामुळे अनेकजण स्वस्तात मिळणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असतात. जर तुम्हीही स्वस्तात स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता Poco c31 हा स्मार्टफोन फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कसे ते जाणून घेऊयात.

अशी मिळत आहे ऑफर

या स्मार्टफोनचे नाव POCO C31 (रॉयल ब्लू, 64 जीबी) (4 जीबी रॅम) आहे. कंपनीचा हा एक एंट्री लेव्हल सेगमेंट स्मार्टफोन असून याची किंमत Flipkart वर 7,749 रुपये इतकी आहे. याची मूळ किंमत सुमारे 12 हजार रुपये असली तरी, सवलतीमुळे तो स्वस्तात खरेदी करता येत आहे. खरं तर फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर भरपूर एक्सचेंज बोनस दिला जात आहे, याचा जर तुम्हाला फायदा झाला तर तो आणखी स्वस्तात खरेदी करता येईल.

फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 7,200 रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर केला जात आहे. जर ही सवलत पूर्ण मिळाली तर तुम्हाला तो केवळ 549 रुपयांना खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे.