Shankarrao Gadakh : एकनाथ शिंदे गटाकडून मंत्री गडाखांनाही फोन अन्.. गडाखांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shankarrao Gadakh:  शिवसेनाचे (Shiv Sena) दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनामध्ये दोन गट निर्माण झाले आहे. आता पर्यंत शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेते यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे आता शिवसेनाच्या तिकिटावर निवडून आलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) एकटेच मंत्री उरले आहेत.तर दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा दिलेल्यांपैकी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) हेही एकटचे मंत्री उरले आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार  जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना देखील सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अनेकदा संपर्क करण्यात आला होता मात्र शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनाच पाठिंबा दिला 

विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि थेट रुग्णालय गाठले.

त्यानंतर काही वेळातच बाहेर या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. तेव्हा गडाख रुग्णालयात होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ते मुंबईतच विश्रांती घेत आहेत.

सर्वांत आधी शिवसेनेला पाठिंबा देणारे गडाखच होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले. अशी पदे इतरांनाही मिळाली, तरीही ते सोडून गेले आणि गडाख मात्र अद्यापर्यंत सोबत आहेत.

गडाख नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती. महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पुढाकारतून गडाखांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. पुढे महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. आता शिवसेनेसाठी मोठ्या कसोटीचा काळ आला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले, ठाकरे कुटुंबियाच्या जवळचे मानले जाणारे अनेक जण अशा काळात ठाकरे यांना सोडून गेले. मात्र, अलीकडेच ठाकरे यांच्यासोबत आलेल्या गडाख यांनी अद्यापही त्यांच्यासोबतच राहणे पसंत केले आहे.