Electric scooter : ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे हजारोंची सवलत, त्वरित घ्या लाभ; पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric scooter : बाजारात अनेक स्कुटर लाँच होतात. यातील काही पेट्रोलवर चालतात तर काही विजेवर चालतात. परंतु पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करतात. आता तुम्ही खूप मोठ्या सवलतीत सर्वात लॉकप्रिय कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

यामुळे तुमची हजारो रुपयांची सहज बचत होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही सणासुदीच्या काळात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप आनंदाची आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

अथर एनर्जी ऑफर

Ather Energy त्यांच्या Ather 450, Ather 450 X 2.9kWh आणि 450 X 3.7kWh स्कूटरवर ऑफर देत आहे. कंपनी तिच्या सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर 450 वर 5,000 रुपयांचा लाभ देत आहे. ग्राहकाच्या जुन्या स्कूटरवर 1,500 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर आणि 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. या सर्व फायद्यांसह, 450 S रुपये 86,050 च्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असून मिड-रेंज 450X 2.9 kWh 1,500 रुपयांच्या कॉर्पोरेट डीलसह आणि 40,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर मिळेल.

ओला इलेक्ट्रिक ऑफर

ओला इलेक्ट्रिक त्यांच्या कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरवर ग्राहकांना 24,500 रुपयांची सवलत दिली जात आहे. ओला इलेक्ट्रिकच्या पोर्टफोलिओमध्ये S1X, S1 Air आणि S1 Pro स्कूटरचा समावेश असून ऑफर अंतर्गत, नवीन Ola S1 Pro सेकंड जनरेशनवर 5 वर्षांच्या बॅटरी वॉरंटीसह 7,000 रुपयांची सवलत मिळत आहे. S1 Air वर वॉरंटी वाढविण्यावर 50 टक्के सवलत मिळेल.

ओला इलेक्ट्रिक 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. ज्याद्वारे ग्राहकांना त्यांची जुनी पेट्रोल स्कूटर बदलता येईल. भागीदार क्रेडिट कार्डसह लवचिक EMI ऑफर अंतर्गत कंपनी 7,500 रुपयांचे मिळतील. यात शून्य डाउन पेमेंट, शून्य प्रक्रिया शुल्क आणि 5.99 टक्के व्याजाचा समावेश असणार आहे. कंपनी रेफरल फायदे देत असून जिथे रेफररला ओला ई-स्कूटर खरेदी केल्यानंतर 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. रेफररला मोफत ओला केअर प्लस आणि 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे.

iVoomi ऑफर

किमतीचा विचार केला तर सवलतीनंतर iVoomi JETX आणि S1 ची किंमत अनुक्रमे 91,999 आणि Rs 81,999 च्या एक्स-शोरूम किंमत आहे, तर iVoomi JETX आणि S1 ची किंमत अनुक्रमे 99,999 आणि Rs 84,999 इतकी आहे. ग्राहकांना 10,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल. यात सहाय्यक उपकरणे, हेल्मेट इत्यादींचा समावेश असून iVoomi स्कूटरचे RTO शुल्क यात कव्हर करते.