एमजी हेक्टरची नेपाळमध्ये निर्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एमजी मोटर इंडियाने आज गुजरातमधील हलोल येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रामधून निर्यातींच्या शुभारंभाची घोषणा केली.(MG Motor) 

कंपनी इतर दक्षिण आशियाई देशांमधील विस्तारीकरण योजनेप्रती पहिले पाऊल म्हणून नेपाळला भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ निर्यात करत शुभारंभ करणार आहे. एमजी मोटर इंडियाने ६ मे २०१९ रोजी भारतामध्ये व्यावसायिक उत्पादनाला सुरूवात केली.

त्यानंतर जून २०१९ मध्ये त्यांची पहिली कार एमजी हेक्टर लाँच केली. एमजी हेक्टरला भारतामध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे आणि स्‍थापनेपासून ७२,५०० हून अधिक भारतीय कुटुंबांचा भाग बनली आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजी मोटर इंडिया सध्या आपल्या कार्यसंचालनांना गती देत आहे,

बाजारपेठ पोहोच व भागधारक समुदायामध्ये वाढ करत आहे आणि एमजी समूहामध्ये नवीन ग्राहक व सहयोगींची भर करत आहे.

हाच उत्साह पुढे घेऊन जात एमजी नेपाळसह सुरूवात करत इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये आपली उपस्थिती विस्तारित करण्यास सज्ज आहे.

हेक्टरने भारतीय ऑटो क्षेत्राप्रमाणे गतीशील व आक्रमक कंपनी म्हणून ऑटो उद्योगक्षेत्रामध्ये आमच्या क्षमता स्थापित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आम्ही एमजी हेक्टरच्या लाँचसह नेपाळमध्ये उपस्थिती निर्माण करण्यास उत्सुक आहोत.” आपला विस्तार करण्यासोबत लैंगिक विविधता व महिला सक्षमीकरण हे एमजीच्या मुलभूत तत्त्वामधील महत्त्वपूर्ण पैलू आहेत.

सध्या कंपनीचे ३७ टक्के कर्मचारी महिला आहेत. नजीकच्या भविष्यात हा आकडा ५० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचा कंपनीचा मनसुबा आहे.

एमजीची नेपाळमधील डिलर भागीदार – पॅरामाऊण्ट मोटर्स प्रा. लि. देखील लैंगिक विविधता मिशनला पाठिंबा देण्याशी संलग्न आहे.

झोण्टा क्लब ऑफ काठमांडूशी संलग्न पॅशन ड्राइव्ह्ज कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी छळ व बालविवाह अशा समस्यांविरोधात आवाज उठवण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणा-या उपक्रमांना पाठिंबा देईल. डिलर भागीदार एमजी सेवा उपक्रमांतर्गत सामुदायिक विकास आणि इतर सामाजिक जबाबदा-यांप्रती कार्य करेल.