Ghee Side Effects : तुम्ही या आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका तूप; होईल गंभीर नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ghee Side Effects : भारतात (India) दुधापासून (Milk) बनवलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यामध्ये तूप (ghee), दही, पनीर यासारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे भारतात दररोजच्या जीवनात तुपाचा वापर केला जातो. मात्र आजारपणात तूप खाणे धोक्याचे ठरू शकते.

वाढत्या वजनाने त्रासलेल्या लोकांनी तुपाचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. तुपाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

तुपाचे सेवन हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि शरीर निरोगी ठेवते. पण तुपाचे सेवन सर्व लोकांसाठी उपयुक्त नाही हे तुम्हाला माहीत आहे.

आरोग्याच्या काही समस्या आहेत ज्यामध्ये तूप खाल्ल्याने समस्या (problem) वाढू शकतात. चला अशा चार आजारांबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये तुपाचे सेवन केल्यास समस्या वाढू शकतात.

तूप आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच काही आजारांमध्ये त्रास वाढवू शकतो. जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने अपचन आणि जुलाबाची समस्या वाढू शकते. तूप पचवणे सोपे काम नाही. ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी तूप सेवन करू नये. अपचन, गॅस, जळजळ अशी तक्रार असेल तर तूप खाणे टाळावे.

विषाणूजन्य ताप असल्यास तूपापासून दूर राहा:

हंगामी ताप किंवा विषाणूजन्य ताप असलेल्या लोकांनी तूप टाळावे. तुपाच्या सेवनाने कफ येतो. त्यामुळे सर्दी-खोकला वाढू शकतो. तुपाच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, भूक न लागणे, उलट्या होणे आणि श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. विषाणूजन्य ताप पावसाळ्यात जास्त त्रास देतो, त्यामुळे तुपाचे सेवन अजिबात करू नका.

यकृताची समस्या असल्यास तूप खाणे टाळावे.

जर तुम्हाला यकृताची समस्या असेल तर तूप खाणे टाळा. यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तूप नीट पचत नाही. ज्या लोकांना यकृताशी संबंधित कोणतीही समस्या आहे त्यांनी तूप सेवन करू नये.

गरोदर महिलांनी तूप टाळावे:

गरोदर महिलांनी तूप टाळावे. गरोदरपणात महिलांची पचनशक्ती अनेकदा चांगली नसते. त्यांना अपचन, गॅस आणि पोटफुगीचा त्रास होतो. गरोदरपणात महिलांनी तुपाचे सेवन केल्यास त्यांच्या समस्या वाढू शकतात.