आमचं पाणी आम्हाला द्या अन्यथा आम्ही आंदोलन करणार – माजी आ.राहुल जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुकडीच्या आवर्तनात विसापूर बाबत कायम दुटप्पी भूमिका घेतली जाते. आवर्तनात विसापूरच्या पाण्यावर दरोडा घालण्याचे काम कायम केले जाते. पाणी सोडू नये यासाठी अधिकार्‍यांवर कोण दबाव ‘टाकत आहे? याचे उत्तर प्रशासनाने दयावे.

त्याच बरोबर अधिकाऱ्यांनी कुठं पण पाणी सोडावे पण आमचं पाणी आम्हाला द्या. अन्यथा आम्ही मंगळवारी गेट तोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आ. राहुल जगताप यांनी प्रशासनाला देत घोड खालील शेतकऱ्यांसाठीदेखील पाणी सोडावे अशी आग्रही मागणी केली.

नगर-दौंड महामार्गावर घोड, कुकडी आणि विसापूर धरणात पाणी सोडावे यासाठी माजी आमदार राहुल जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करत त्याचे निवेदन पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना तसेच प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार सुषमा रेडके यांना देण्यात आले.

पुढे बोलताना जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्‍यात शेतकर्‍यांना पाण्यासाठी कायम आंदोलन करावे लागत आसून ही उपरेपणाची ‘वागणूक योग्य नसल्याची खंत व्यक्‍त करत असताना तालुक्‍याचे प्रमुख म्हणून तहसीलदार मिलींद कुलथे यांनी उपस्थित राहणे गरजेचे असताना

त्यांनी प्रशिक्षणार्थी महिला नायब तहसीलदार रेडके यांना का पाठविले. तसेच तालुक्‍यात असणाऱ्या आंदोलन, उपोषणाना तहसीलदार कायम गैरहजर का असतात ? हे संशोधनाचे काम असल्याची टीका करत तहसीलदार नेमके कुठे असतात ? आण्णासाहेब शेलार यांनी केली.

विसापूर आणि घोडचे आवर्तन तात्काळ सोडावे अशी मागणी यावेळी केली. अण्णासाहेब शेलार यांनी बोलताना कुकडी आवर्तनात ओढ्यानाल्याने पाणी सोडले जाते तर काही ठिकाणी खाजगी तलावात पाणी सोडले जाते मग विसापूर धरणात पाणी सोडायला काय अडचण आहे असा प्रश्‍न उपस्थित करत.

कुकडीचे अभियंता हे जाणुन बुजून विसापूर धरणांत पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत, विसापूरमध्ये पाणी नाही सोडले तर सर्व शेतकरी आपल्या जनावरांसह, बायका मुलांसह रस्त्यावर उतरतील मग गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.