Gold Price Today : अर्रर्र.. ग्राहकांना पुन्हा धक्का! सोने-चांदीच्या दरात कमालीची वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे अनेकजण मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत. अशातच जर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुम्हाला धक्का देणारी एक बातमी आहे.

कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. इतकेच नाही तर चांदीही महाग झाली आहे. आधीच महागाईची झळ बसलेल्या ग्राहकांना आता पुन्हा एकदा महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. दरम्यान आता तुम्हाला सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोने प्रति 10 ग्रॅम 244 रुपयांनी महाग होऊन 61208 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर त्यापूर्वी म्हणजेच शुक्रवारी मागील व्यवहारात, सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 621 रुपयांनी स्वस्त होऊन 60964 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.

तर सोमवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोमवारी चांदीच्या भावात 415 रुपयांनी वाढ होऊन 72455 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदी 2695 रुपयांनी स्वस्त होऊन 72040 रुपये किलोवर बंद झाली आहे.

जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

24 कॅरेट सोने 244 रुपयांनी महाग होऊन 61,208 रुपये झाले आहे. तर 23 कॅरेट सोने 243 रुपयांनी महाग होऊन 60,963 रुपये, 22 कॅरेट सोने 234 रुपयांनी महाग होऊन 56,067 रुपये, 18 कॅरेट सोने 183 रुपयांनी महाग होऊन 45,146 रुपये झाले. तसेच 14 कॅरेट सोने 144 महाग होऊन 35807 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार होत आहे. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत आहे.

सोने 400 रुपयांनी तर चांदी 7500 रुपयांनी स्वस्त

सोन्याचे दर 438 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून त्या दिवशी सोन्याचा भाव 60880 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला. तर चांदी अजूनही 7525 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.