OLA Move OS3 : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता इलेक्ट्रिक स्कूटरसाठी जारी होणार नवीन अपडेट,असा होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OLA Move OS3 : देशात इंधनाच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहने वापरू लागले आहेत. ओला ही आघाडीची इलेक्ट्रिक वाहने तयार करणारी कंपनी आहे.

ओलाने आपल्या ग्राहकांना एक गुडन्यूज दिली आहे. कारण आता Ola च्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Move OS3 हे अपडेट जारी होणार आहे. याचा ग्राहकांना काय होणार फायदा जाणून घेऊयात.

कधी मिळेल नवीन अपडेट

कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यापासून ओलाच्या स्कूटर्स नवीन Move OS 3 मध्ये अपडेट केल्या जातील. काही दिवसांपूर्वी याचे बीटा व्हर्जन कंपनीने रिलीज केले होते. जे काही ग्राहकांना मिळाले. परंतु, आता हे अपडेट सर्व ग्राहकांसाठी जारी करण्यात येणार आहे.

भाविश अग्रवाल यांनी दिली ही माहिती

भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर सांगितले की ‘MoveOS 3 पुढील आठवड्यात सर्वांसाठी उपलब्ध होत आहे! त्याच्या फीचर्समध्ये अनेक गोष्टी आणि परफॉर्मन्समध्ये मोठी सुधारणा असणार आहे. आशा आहे की तुम्ही सर्वांचा आनंद घ्याल. ओला एसडब्ल्यू टीमने उत्तम काम केले आहे. कंपनीने एका वर्षात तीन मोठे रिलीज केले आहेत’.

काय असणार खासियत

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन Move OS 3 मध्ये जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत. या फीचर्समध्ये हायपरचार्जर नेटवर्कसोबतच कंपॅटिबिलिटी मोड, पार्टी मोड, मूड प्रॉक्सिमिटी अनलॉक यासारखे फीचर्स उपलब्ध असणार आहेत. स्कूटर पार्टी मोडमध्ये बदलताच, पार्टी मोडनुसार दिवे सेट केले जातील.

तसेच , प्रॉक्सिमिटी लॉक आणि अनलॉक स्कूटर मॅन्युअली लॉक किंवा अनलॉक करण्याची गरज दूर करेल. या अपडेटनंतर, स्कूटर जवळ येताच ती अनलॉक आणि दूर जाताच लॉक होईल.

मिळणार हायपर चार्जिंग

या अपडेटमध्ये हायपर चार्जिंग मिळेल. त्यामुळे स्कूटरला कमी वेळेत जास्त चार्ज करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, या फीचरच्या माध्यमातून स्कूटर फक्त एक मिनिट चार्ज करून तीन किलोमीटरपर्यंत चालवता येईल. या फीचरसह स्कूटर 15 मिनिटांसाठी चार्ज केल्यानंतर स्कूटर 50 किलोमीटरपर्यंत चालवता येईल.

मिळतात या स्कुटर्स

कंपनीकडून दोन स्कूटर म्हणजे एस वन आणि एस वन प्रो विकल्या जात आहेत. तर ऑक्टोबरच्या अखेरीस एक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त स्कूटर, Ola Ace One Air साठी बुकिंग फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे तर वितरण एप्रिल 2023 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.