iPhone Offer : आयफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या बुकिंगवर मिळत आहे 15 हजार रुपयांची सूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone Offer : जगभरात आयफोनचा चाहतावर्ग जास्त आहे. अनेकांना आपल्याकडेही आयफोन असावा असे वाटते परंतु, त्यांना किंमत जास्त असल्यामुळे तो विकत घेता येत नाही. परंतु, तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे. कारण लवकरच iPhone 14 आणि iPhone 14 Plus चे पिवळ्या रंगाचा फोन तुम्हाला विकत घेता येणार आहे.

जर तुम्हाला हे फोन खरेदी करायचे असतील तर त्याची विक्री 14 मार्चपासून सुरु होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फोनच्या प्री-बुकिंगवर तुम्हाला एक दोन नव्हे तर 15 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. हे लक्षात घ्या की अशी ऑफर सारखी उपलब्ध होत नाही त्यामुळे आता हाती आलेली संधी सोडू नका.

जाणून घ्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus पिवळ्या रंगाची किंमत

iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या नवीन कलर मॉडेल्सची विक्री 14 मार्चपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये आणि iPhone 14 Plus ची सुरुवातीची किंमत 89,990 रुपये इतकी आहे.

Apple India वितरक Redington India ने iPhone 14, iPhone 14 Plus वर पिवळ्या रंगात ऑफर जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत आता ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहे. ऑफरमध्ये झटपट कॅशबॅकपासून ते स्टोअर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरपर्यंत दिल्या जाणार आहेत.

काय आहेत फीचर्स

नवीन कलर मॉडेलमधील फीचर्सबाबत कंपनीने कोणताही बदल केला नाही. iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे, तर iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. iPhone 14 आणि iPhone 14 Plus या दोन्ही फोनमध्ये Apple A15 Bionic चिपसेट असणार आहे.

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचे दोन्ही फोन 512 GB पर्यंत स्टोरेजमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये 12-megapixel ड्युअल वाइड अँगल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. HDR व्हिडिओ आणि डॉल्बी व्हिजन कॅमेरासह समर्थित आहेत.