PM Kisan Yojana: सरकारने कोट्यवधी शेतकर्‍यांना दिली ही आनंदाची बातमी, काय आले नवीन अपडेट जाणून घ्या येथे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या करोडो शेतकऱ्यांना केंद्र सरकारने (central government) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. वास्तविक, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आता शेतकरी (farmer) 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई-केवायसी करू शकतील. यापूर्वी ही तारीख 31 जुलै 2022 होती.

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) हप्ता मिळविण्यासाठी, ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी केले नाही, तर तो हप्त्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतो. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम मुदत वाढवण्याची माहिती दिली आहे.

पोर्टलने म्हटले आहे की, “पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. नोंदणीकृत शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. पोर्टलवर OTP आधारित eKYC सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक (biometric)आधारित eKYC करता येते.

केंद्र सरकारने आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 11 हप्ते हस्तांतरित केले आहेत. शेवटचा हप्ता 31 मे रोजी पाठवला होता. पुढील म्हणजे 12 व्या हप्त्याचे पैसे ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबर महिन्यात पाठवले जाऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये करून ही रक्कम दिली जाते.

ई-केवायसी कसे करावे? –

– सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
– येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
– आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक (Aadhaar Number) टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
– आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
– सबमिट OTP वर क्लिक करा.
– आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.