Groundnut Farming: भुईमूग पिकातून लाखोंची कमाई होणारं….! फक्त हे एक काम लवकरात लवकर करावं लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Groundnut Farming: देशात खरीप हंगाम (kharif season) सुरु आहे. या खरीप हंगामात देशातील शेतकऱ्यांनी (Farmer) मोठ्या प्रमाणात भुईमूग या पिकाची शेती (farming) सुरु केली आहे.

खरीप पीक चक्राच्या सुरुवातीला म्हणजे मान्सूनचा पाऊस (monsoon rain) पडल्यावर लगेचचं अनेक शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या पेरणीचे काम हाती घेतले. राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी भुईमूग या खरीप हंगामातील मुख्य पिकाची (groundnut crop) पेरणी केली आहे.

अशा स्थितीत अनेक पिके 15 ते 25 दिवसांची झाली आहेत, त्यामध्ये पीक व्यवस्थापन व निरीक्षण करावे लागणार आहे. विशेषतः पावसानंतर शेतात हानिकारक तण वाढतात, जे जमिनीतील सर्व पोषण शोषून पिकाच्या वाढीवर परिणाम करतात. यासोबतच सध्या राज्यात मोसमी पाऊस जोर धरत आहे यामुळे शेतातील पाणी बाहेर काढणे अतिशय आवश्यक आहे. शिवाय खत व्यवस्थापनाची कामेही वेळेत व्हायला हवीत.

भुईमूग पिकातील पोषण व्यवस्थापन

भुईमूग पिकासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते पिकातील पोषण व खत व्यवस्थापनाचे काम मृदा परीक्षणच्या आधारे करावे. साधारणपणे भुईमूग पिकासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे, बोरॉन यांची गरज असते.  ही खते गरजेनुसार शेतात टाकता येतात. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते एनपीके खतांची पेरणीही करू शकतात.  लक्षात ठेवा की खतांऐवजी, शेतात आवश्यकतेनुसार, शेण आणि कंपोस्ट घालणे आवश्यक आहे.

भुईमूग पिकातील तण व्यवस्थापन

>विविध पिकांच्या लागवडीदरम्यान तणांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तण किंवा गवत पिकाच्या वाढीमध्ये अडथळा बनतात. त्यांच्या प्रतिबंधासाठी, तण काढण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून ही हानिकारक झाडे उपटून नष्ट करता येतील.

>तज्ज्ञांच्या मते तणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पेरणीपूर्वी शेतात खोल नांगरणी करावी आणि निंबोळी पेंड टाकावे.

>माती नाजूक बनवून, तणांची वाढ थांबवता येते. यासाठी दर 1 महिन्यातून 2-3 वेळा खुरपणी किंवा निंदणी करावी.

>पिकात तण काढण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे पिकाच्या मुळांना ऑक्सिजनही मिळतो आणि जमिनीतील पोषक तत्वही पिकाला मिळतात.

>तणांच्या रासायनिक नियंत्रणासाठी एक किलो पेंडीमेथालिन 1000 लिटर पाण्यात विरघळवून पिकावर प्रति हेक्‍टरी या प्रमाणात फवारणी करावी.

या गोष्टी लक्षात ठेवा 

>भुईमुगाच्या पेरणीनंतर प्रथमच पिकाचे व्यवस्थापन करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण अशा परिस्थितीत पीक अत्यंत नाजूक असते.

>भुईमुगाचे बहुतांश सिंचन पावसावर अवलंबून असले तरी कमी पाऊस झाला तर पिकात ओलावा टिकवणे आवश्यक आहे.

>जर भुईमुगाची पेरणी उशिरा झाली असेल तर रोपांवर माती चढवावी लागणार आहे.

>भुईमूग पिकातून सुया निघत असताना तण काढू नये.

अनेकदा पावसामुळे भुईमुगाच्या पिकात जास्त पाणी भरते, जे पीक आणि माती या दोघांसाठी हानिकारक आहे.

>अशा परिस्थितीत वेळेत शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा.

>भुईमूग लागवडीतून चांगली व निरोगी वाढ मिळविण्यासाठी शेतात जीवामृत शिंपडणे फायदेशीर ठरते.