हसन मुश्रीफ म्हणतात दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली.

यावेळी हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसांनी लॉकडाऊनलागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ, असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, “दुकानं सुरू करण्याच्या परवानगीबाबतची भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आहेत. 2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे.

आपण व्यावहारिक भूमिका घेऊ. आम्ही राजकारण करणार नाही पण लस, रेमडिसिव्हीर कमी पडणार नाही याची काळजी मोदी साहेबांनी घेतली पाहिजे.

मुख्यमंत्री गेले तीन-चार दिवस वेगळ्या घटकांची चर्चा करताहेत. पॅकेजबाबत योग्य तो निर्णय ते घेतील. इतके जीव गेल्यानंतर का होईना केंद्राने रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली.

याबद्दल केंद्राचे आभार मानले पाहिजेत. दरेकर म्हणतात आम्ही केंद्रावर बोलतो, औषध लस याची कमतरता असताना आणखी काय केलं पाहिजे”

दरम्यान राज्यात गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ठाकरे सरकार राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे.

१४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू केला तर

आर्थिक नुकसान कसं भरून काढायचं? लॉकडाऊनचा अवधी किती असावा यावर रविवारी टास्कफोर्सच्या बैठकीत चर्चा झाली.

मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं गरजेचे आहे यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|